नालासोपाऱ्यात ड्रग्स तस्करी करणाऱ्या नायजेरियन महिलेला अटक; २ कोटी रुपयांचे मॅफेड्रॉन ड्रग जप्त

Spread the love

नालासोपाऱ्यात ड्रग्स तस्करी करणाऱ्या नायजेरियन महिलेला अटक; २ कोटी रुपयांचे मॅफेड्रॉन ड्रग जप्त

योगेश पांडे / वार्ताहर

वसई – तुळींज पोलिसांनी एका नायजेरीयन महिलेला अटक केली असून तिच्याकडून दोन कोटी रुपयांचे मॅफेड्रॉन हे अमली पदार्थ जप्त केले आहे. नालासोपारा शहरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अमली पदार्थांचा व्यवहार चालतो. एक नायजेरियन महिला अमली पदार्थांची विक्री करत असल्याची माहिती तुळींज पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार मध्यरात्री नालासोपारा पूर्वेच्या प्रगती नगर येथील एसपी अपार्टमेंट येथे पोलिसांनी छापा टाकला. त्यावेळी या महिलेकडे सुमारे दोन कोटी रुपये किमतीचे मॅफेड्रॉन (एमडी) हे अमली पदार्थ आढळून आले. एडिका जोसेफ – ३० असे या महिलेचे नाव असून ती मूळची नायजेरियन देशाची नागरिक आहे. तिच्या व्हिजा ची मुदत संपली होती आणि ती भारतामध्ये बेकायदेशीररित्या राहत होती, असे तुळींज पोलिसांनी सांगितले. या महिलेला अटक केली असून तिच्या विरोधात गुंगीकारक औषधीद्रव्य आणि मनोवैद्यानिक परिणाम करणारे पदार्थ अधिनियम १९८५(एनडीपीएस ऍक्ट ) कलम ८ (क), २१ (क) सह विदेशी नागरिक कायदा १९४६ चे कलम १४(अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती तुळींज पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेंद्र नगरकर यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon