इमारतीचा भाग कोसळला; मुंबईत भांडुप रेल्वे स्टेशनच्या परिसरात दुर्घटना
योगेश पांडे / वार्ताहर
मुंबई – मुंबईतून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. मुंबईतील भांडुप रेल्वे स्टेशनच्या परिसरात एका इमारतीचा भाग कोसळला. अत्यंत रहदारीचा असलेल्या या परिसरात इमारतीचा भाग कोसळल्यामुळे खळबळ उडाली. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीविताहानी झाली नाही. मात्र, या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली.
मिळालेल्या माहितीनुसार, भांडुप रेल्वे स्टेशन परिसर हा नेहमी गर्दीने गजबजलेला असतो. या भागामध्ये स्टेशनला लागून असलेल्या प्लाझा इमारतीचा भाग कोसळला. अचानक इमारतीचा भाग कोसळ्यामुळे मोठा आवाज झाला. मोठा आवाज झाल्यामुळे एकच खळबळ उडाली.
भांडुप पश्चिम येथील स्टेशनजवळ झालेल्या या घटनेमुळे परिसरात एकच धावपळ उडाली. इमारतीचा स्लॅब कोसळला असल्याचं निदर्शनास आलं. इमारतीखाली उभी असलेली वाहनं ढिगाराखाली सापडली. सुदैवाने दुपारची वेळ असल्याने या ठिकाणी गर्दी कमी होती. त्यामुळे या दुर्घटनेत कोणतीही जिवीतहानी झाली नाही.
घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळीवर स्लॅबचा ढिगार बाजूला करण्यात आले. नेमकं दुपारीची वेळ होती. संध्याकाळी या भागामध्ये चाकरमान्यांची घराकडे जाण्यासाठी मोठी गर्दी असते. त्यामुळे ऐन गर्दीच्या आधी ही घटना घडली.