पत्नीच्या अनैतिक संबंधांमुळे बाळासाहेबांच्या निष्ठावंत शिवसैनिकाची पत्नी व प्रियकराकडून हत्या

Spread the love

पत्नीच्या अनैतिक संबंधांमुळे बाळासाहेबांच्या निष्ठावंत शिवसैनिकाची पत्नी व प्रियकराकडून हत्या

योगेश पांडे / वार्ताहर 

पनवेल – पनवेलमधील जेष्ठ शिवसैनिक विष्णू गवळी (५८) यांची हत्या त्यांच्या पत्नीने व तीच्या प्रियकराने खांदेश्वर येथील गवळी यांच्या राहत्या घरी केली. तीन दिवसांपूर्वी गवळी यांचा सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सूमारास आकस्मात मृत्यू झाला होता. विष्णू यांचे भाऊ शिवाजी यांनी शनिवारी मध्यरात्री पोलीसांना दिलेल्या तक्रारीनंतर खांदेश्वर पोलीसांनी हत्येचा गुन्हा नोंदवला. विष्णू गवळी हे खांदेश्वर वसाहतीमधील सेक्टर ९ येथील पीएल ५ टाईपमधील सिद्धिविनायक इमारतीमध्ये कुटुंबासोबत राहत होते. विष्णू यांची ३७ वर्षीय पत्नी अश्विनी व त्यांचा २६ वर्षीय वाहनचालक समीर ठाकरे यांच्यामध्ये अनैतिक संबंध होते. याबाबत विष्णू यांना समजल्यावर त्यांनी अश्विनी व समीर यांच्या भेटीला विरोध सुरु केला. विष्णू यांची होणारी अडचण टाळण्यासाठी आणि विष्णू यांच्या मृत्यूपश्चात अश्विनीला मिळणाऱ्या संपत्तीमुळे या दोघांनी विष्णू यांची हत्या केल्याचे पोलीसांच्या तक्रारीत म्हटले आहे

बाळासाहेब ठाकरे यांचे निष्ठावंत शिवसैनिक म्हणून विष्णू हे ओळखले जात. तसेच अंदमान पोर्टब्लेअर येथील महाराष्ट्र मंडळाचे ते काम करीत असून ते अनेक वर्षे वीर सावकरांच्या विचारांचे प्रचारक होते. सरकारी प्रशासकीय अधिकाऱ्यांमध्ये ते स्वतःची ओळख लपवून गुप्तहेर म्हणून करत असत. त्यांच्या हत्येच्या बातमीमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon