मुलाच्या मृत्यूबाबत जाब विचारला म्हणून संतापलेल्या डॉक्टरकडून महिलेला शिवीगाळ करत विनयभंग

Spread the love

मुलाच्या मृत्यूबाबत जाब विचारला म्हणून संतापलेल्या डॉक्टरकडून महिलेला शिवीगाळ करत विनयभंग

योगेश पांडे / वार्ताहर 

नवी मुंबई – नवी मुंबई येथील अपोलो रुग्णालयात डॉक्टरने मृत रुग्णाच्या आईसोबत गैरवर्तन केल्याचा प्रकार समोर आला आहे. मुलाच्या मृत्यूबाबत जाब विचारला म्हणून संतापलेल्या डॉक्टरने महिलेला शिवीगाळ करत मारण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी महिलेच्या तक्रारीवरुन पोलिसांनी विनयभंगासह अनेक कलमांर्तगत गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सीबीडी येथील ५६ वर्षीय महिलेच्या मुलाचा उपचारादरम्यान ३० मे २०२४ रोजी मृत्यू झाला होता. मुलाच्या मृत्यूनंतर महिलेने अरोलो रुग्णालयाच्या डॉक्टरांवर योग्य उपचार न दिल्याने मृत्यू झाल्याचा आरोप केला होता. डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे माझ्या मुलाचा मृत्यू झाला आहे, असे आरोप पीडित महिलेने डॉक्टरांवर केले. पीडितेने डॉक्टरांना याबाबत विचारले तेव्हा डॉक्टरांनी तिला शिवीगाळ केली आणि तिच्या अंगावर धावून तिचा ड्रेस ओढला.

नवी मुंबई सीबीडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरीधर गोरे यांनी सांगितले की,शनिवारी डॉक्टर राजेश शिंदे विरोधात कलम ७४ (महिलेवर तिची विनयभंग करण्याच्या उद्देशाने प्राणघातक हल्ला किंवा गुन्हेगारी बळाचा वापर करणे), कलम ७९ (शब्द, हावभाव किंवा कृती) या तरतुदींनुसार एफआयआर नोंदवण्यात आला आहे. सीबीडी बेलापूर पोलीस या प्रकरणाचा तपास करत असून अपोलो हॉस्पिटल येथील सीसीटीव्ही तपासले जात आहेत. या गुन्ह्यात अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही, असे पोलिसांनी सांगितले. तक्रार दाखल करण्यास विलंब का झाला हे तक्रारीत स्पष्ट केलेले नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon