बोईसर ग्रामस्थ आरोग्य उपकेंद्राच्या प्रतीक्षेत! श्रेय वादामुळे बोईसर ग्रामस्थांचे नुकसान

Spread the love

बोईसर ग्रामस्थ आरोग्य उपकेंद्राच्या प्रतीक्षेत! श्रेय वादामुळे बोईसर ग्रामस्थांचे नुकसान

प्रमोद तिवारी

बोईसर – प्राथमिक आरोग्य केंद्रअंतर्गत बोईसर येथे उपकेंद्र व्हावे, अशी मागणी सातत्याने ग्रामस्थांमधून केली जात होती. माजी जिल्हा परिषद सदस्या रंजना संखे ह्यांनी आरोग्य उपकेंद्रासाठी पाठपुरावा केला, त्याचप्रमाणे माझी जिल्हा परिषद सदस्य व विद्यमान बोईसर ग्रामपंचायत सदस्य परशुराम दुमाडा यांनीही या उपकेंद्रासाठी खुप प्रयत्न केले. उपकेंद्रासाठी बोईसर ग्रामपंचायतीने जागा उपलब्ध करून दिल्याने अखेर त्याला यश आले होते. जिल्हा नियोजन आरोग्य विभागाकडून १ कोटी ६२ लक्ष निधीही मंजूर झाला त्या अनुषंगाने ६ मार्च २०२४ रोजी ग्रामपंचायत निवासस्थानाचे उद्घाटन पालघर लोकसभेचे खासदार राजेंद्र गावित व पालघर विधानसभेचे आमदार श्रीनिवास वनगा यांच्या हस्ते झाल्यानंतर जिल्हा परिषद सदस्य महेंद्र भोणे यांनी जिल्हा परिषदेच्या सभेमध्ये उद्घाटनावर प्रश्न उपस्थित केला व लेखी स्वरूपात आक्षेप नोंदवला त्यामुळे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) यांच्याकडे बोईसर ग्रामपंचायतीच्या विरोधात दोन वेळा सूनावण्या (हेरिंग) झाल्या.

जिल्हा नियोजन समितीच्या बैठकी मध्ये जिल्हा नियोजन समिती सदस्य निलम संखे यांनी विषय उपस्थित केला की ,बोईसर प्राथमिक आरोग्य उपकेंद्राच्या कामाचे भूमिपूजन झालं असून, कामाला सुरुवात का झाली नाही? असा प्रश्न उपस्थित केला तदनंतर पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री ,जिल्हा परिषद अध्यक्ष, व मुख्य कार्यकारी अधिकारी(सीईओ) यांनी भूमिपूजनाचा दिवस निश्चित करून आज रोजी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते परंतु या संभ्रमाच्या वातावरणामुळेच तेथील ग्रामस्थांनी प्राथमिक आरोग्य उपकेंद्राला विरोध केला. भूमिपूजन पालघर जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश निकम ह्यांच्या हस्ते करण्याचे ठरले असता ग्रामस्थांच्या विरोधामुळे आजही भूमिपूजन झाले नाही.शेवटी शब्द शुमनाने भूमिपूजन करून अध्यक्ष निघून गेले. कुठे तरी आरोग्य धनसंपदा ह्या सुविचाराचा श्रेयवादामुळे विसर पडलेला दिसतो. बोईसर येथील ग्रामस्थ व महिलांना आरोग्यविषयक सेवा सुविधांसाठी पालघर प्राथमिक आरोग्य केंद्रात जावे लागत होते. त्यामुळे गावातच उपकेंद्र होण्याची मागणी अनेक वर्षे केली जात होती. मात्र, त्यासाठी आवश्यक जागा उपलब्ध होत नव्हती. ती जागा बोईसर ग्रामपंचायत सरपंच दिलीप धोडी, उप सरपंच निलम संखे, ग्रामपंचायत सर्व सदस्य ह्यांनी उपलब्ध करून दिली. ह्या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी पालघर जिल्हा परिषदअध्यक्ष प्रकाश निकम , समाज कल्याण सभापती मनीषा निमकर, जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या रंजना संखे, भावना विचारे , निता पाटील, महेंद्र भोणे, चेतन धोडी, जितेंद्र संखे, जिल्हा वैद्यकीय अधिकारी, संबंधित विभागाचे अधिकारी, श्याम संखे अमित संखे , अंगणवाडी, बालवाडी सेविका उपस्थित होत्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon