ठाण्यामध्ये सरकारी नोकरीच्या आमिषाने दहा जणांची फसवणूक; पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

Spread the love

ठाण्यामध्ये सरकारी नोकरीच्या आमिषाने दहा जणांची फसवणूक; पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

पोलीस महानगर नेटवर्क

ठाणे – राज्यात वेगवेगळ्या प्रकारे फसवणुक मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. पोलीस नागरिकांना आमिषाला बळी न पडण्याचे अनेक वेळा आवाहन करून देखील काहीच उपयोग होत नसल्याचे दिसून येत आहे. अशीच एक घटना ठाण्यामध्ये घडली आहे. सरकारी नोकरी देण्याचे आमिष देऊन दहा जणांची १३ लाखांनी फसवणूक केली आहे. पीडितांनी चार लोकांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलीस या प्रकरणाची चौकशी करीत आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी पीडितांना रुग्णालयात एक्सरे विभागात बिलिंग कर्मचारी म्हणून नोकरी देऊ असे आमिष देत फसवले. फसवणूक प्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला आहे. नौपाडा पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यानी सांगितले की, पीडितांच्या तक्ररीवरून पोलिसांनी शुक्रवारी मोहम्मद रजा अब्दुल शेख, अभिजित कुलकर्णी, प्रकाश दुर्वे यांच्या विरोधात भारतीय न्याय संहिता प्रावधान अंर्तगत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

आरोपी मागील वर्षांपासून ऑनलाईन देवाणघेवाण मध्यमातून लोकांकडून पैसे घेते होते तसेच लोकांना रुग्णालयात एक्सरे विभागात बिलिंग कर्मचारी म्हणून नोकरी देऊ असे आमिष देण्यात आले होते तसेच आरोपींनी ठाणे महानगरपालिका नगर आयुक्त व्दारा जारी करण्यात आलेले ऑफर लेटर, प्रशिक्षण आणि ज्वाइनिंग लेटर, निवड पत्र इत्यादी बनावट कागदपत्र तयार केले होते. पीडित लोकांनी संबंधित कार्यालयाशी संपर्क साधल्यावर या रॅकेटचा पर्दाफाश झाला. पत्रांची वास्तविकता आणि चौकशी करण्यासाठी वरिष्ठ अधिकारयांशी भेट घेतली असता त्यावेळी सत्य परिस्थिती समजली. सदर प्रकरणाची चौकशी नौपाडा पोलीस करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon