वसईमध्ये ॲक्सिस बँकेचे एटीएम फोडले, ४ लाख ३० हजारांची रोकड लंपास

Spread the love

वसईमध्ये ॲक्सिस बँकेचे एटीएम फोडले, ४ लाख ३० हजारांची रोकड लंपास

योगेश पांडे / वार्ताहर 

वसई – नायगाव पूर्वेच्या टीवरी राजावळी रस्त्यालगत ॲक्सिस बँकेचे एटीएम चोरट्यांनी फोडले आहे. बुधवारी पहाटे साडेतीनच्या सुमारास ही घटना घडली. यात चोरट्यांनी ४ लाख ३० हजारांची रोकड लंपास केली आहे. नायगाव पूर्वेच्या टीवरी राजावळी रस्त्यालगत नवकार फेज थ्री इमारत आहे. या इमारतीत ॲक्सिस बँकेचे एटीएम आहे. बुधवारी पहाटेच्या सुमारास चोरट्यांनी एटीएममध्ये प्रवेश करून गॅस कटरच्या सहाय्याने हे एटीएम फोडले. यातील चार लाख २९ हजार ७०० इतकी रोकड लंपास केली आहे.

नायगाव पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला आहे. एटीएम फोडताना त्या ठिकाणी दोन व्यक्ती असल्याचे समजले आहे, मात्र आणखी त्याचे साथीदार सोबत असण्याची शक्यता आहे. त्याचाही तपास सुरू असल्याची माहिती नायगाव पोलिसांनी दिली. यापूर्वीसुद्धा वसई विरारमध्ये एटीएम फोडीच्या घटना घडल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon