धक्कादायक ! वसंत मोरे यांची या महिन्यात विकेट काढणार; मनसे कार्यकर्त्याकडून धमकीचा फोन
पोलीस महानगर नेटवर्क
पुणे – पुण्यातील धडाडीचे शिवसेनेचे (उबाठा) नेते तथा माझी नगरसेवक वसंत मोरे यांना मनसेच्या एका कार्यकर्त्यांनी फोन करून धमकी दिली आहे. या धमकीचा ऑडिओ कॉल स्वतः वसंत मोरे यांनी त्यांच्या एक्स (पूर्वीचे द्विट) हॅण्डल या प्लॅटफॉर्मवरून शेअर केला आहे. याप्रकरणी त्यांनी भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.
यावर वसंत मोरे यांची पोस्ट काय?
मी जर पुन्हा माझ्या जुन्या पक्षात गेलो, तर असा काय गुन्हा केलाय, की अगदी मनसे वाले माझा मर्डर करण्यापर्यंत गेले…? संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यासाठी भारती विद्यापीठ पोलिस स्टेशन येथे मागणी केली आहे… पाहू पोलीस आता यावर काय भुमिका घेतात…