मुंबईत बांधकामाची जमीन खचली; एका मजुराचा मृत्यू
योगेश पांडे / वार्ताहर
मुंबई – मुंबईतील गोरेगाव पूर्व दिंडोशी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका बांधकामाधीन जागेत जमीन खचल्याने अनेक मजूर अडकल्याची घटना समोर आली आहे. माहिती मिळताच अग्निशमन दलाचे अधिकारी आणि पोलीस तात्काळ घटनास्थळी पोहोचले असून दरड कोसळलेल्या कामगारांना बाहेर काढण्याचे काम सुरू केले. अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे ही दरड कोसळली आहे.
मुंबईतील मालाड पूर्व दिंडोशी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अमेठी कन्स्ट्रक्शन समुद्र बारशेजारी जमीन खचल्याने ४ मजूर अडकल्याची घटना समोर आली आहे. माहिती मिळताच अग्निशमन दलाचे अधिकारी आणि पोलीस तात्काळ घटनास्थळी पोहोचले असून दरड कोसळलेल्या कामगारांना बाहेर काढण्याची सुरुआत केली. अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे ही दरड कोसळली आहे. त्यामुळे बांधकामाधीन जागेवर काम करणारे ४ मजूर त्या भूस्खलनात अडकले.अग्निशमन दलाचे अधिकारी आणि एनडीआरएफच्या पथकाने भूस्खलनातून ४ मजुरांना बाहेर काढले आणि त्यांना उपचारासाठी जवळच्या ट्रॉमा सेंटरमध्ये पाठवले. त्यापैकी एका मजुराला डॉक्टरांनी मृत घोषित केले असून एकाचीची प्रकृती चिंताजनक आहे. २ कामगारांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे सांगण्यात येत आहे.