पुण्यात सोने खरेदी विक्रीतून नफ्याचे आमिष दाखवून ज्येष्ठाची २० लाखांची फसवणूक

Spread the love

पुण्यात सोने खरेदी विक्रीतून नफ्याचे आमिष दाखवून ज्येष्ठाची २० लाखांची फसवणूक

पोलीस महानगर नेटवर्क

पुणे – राज्यात ऑनलाईन सायबर चोरट्याचा सुळसुळाट सुरू झाला आहे. हे सायबर चोरटे जास्तीत जास्त जेष्ठ नागरिकांची फसवणूक करतात. पोलिसांनी अनेक वेळा आवाहन करून देखील नागरिक आमिषाला बळी पडून आपले आर्थिक नुकसान करून घेतात. अशीच एक घटना कोथरूड परिसरात घडली आहे. सोने खरेदी-विक्री व्यवसायातून जास्त नफा मिळत असल्याचे सांगून एका ६४ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाला जास्त नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून २० लाखांची फसवणूक केली. हा प्रकार कोथरुड येथे घडला आहे. याप्रकरणी एका व्यक्तीवर गुन्हा दाखल केला आहे. याबाबत एरंडवणे येथे राहणाऱ्या ६४ वर्षीय व्यक्तीने मंगळवारी (दि.१६) अलंकार पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार मयुर फडके (रा. बंधुप्रेम सोसायटी, कर्वेनगर) याच्यावर आयपीसी ४०६, ४२० नुसार गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी मयुर व फिर्यादी यांची ऑक्टोबर २०२३ मध्ये ओळख झाली. त्यावेळी मयुर याने सोने-खरेदी विक्रीचा व्यवसाय करत असल्याचे सांगितले. सोने-खरेदी विक्री व्यवसायातून जास्त नफा मिळत असल्याचे सांगून फिर्यादी यांचा विश्वास संपादन केला. त्यानंतर फिर्यादी यांना सोने खरेदी विक्री व्यवसायातून जास्त नफा मिळवून देतो असे आमिष दाखवून गुंतवणूक करण्यास सांगितले. मयुर याच्यावर विश्वास ठेवून फिर्यादी यांनी आरोपीला २० लाख रुपये रोख स्वरुपात दिले. पैसे घेतल्यानंतर मयुर फडके याने फिर्यादी यांना नफा अथवा घेतलेली रक्कम परत न करता फसवणूक केली. फिर्यादी यांनी वारंवार पैशांची मागणी केली असता त्याने टाळाटाळ केली. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर ज्येष्ठ नागरिकाने पोलीस ठाण्यात तक्रार दिली. कोथरूड पोलीस पुढील तपास करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon