अनेक दिवसांपासून चकवा देणाऱ्या आरोपीला विष्णूनगर पोलिसांनी ठोकल्या बेड्या; अनेक गुन्ह्यांची उकल
पोलीस महानगर नेटवर्क
डोंबिवली – गेल्या अनेक दिवसांपासून डोंबिवली परिसरात फसवणूक व इतर गुन्ह्यांची मालिका सुरूच होती. यामध्ये विष्णूनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत फसवणूक प्रकरणी विष्णुनगर पोलीस ठाणे गु.र. नं. ६५३/२०२४ भादवी कलम ४२०, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल झाला असता विष्णूनगर पोलिसांनी सीसीटीव्हीच्या माध्यमातून आरोपीचा शोध घेऊन आरोपी विजय दत्ताराम तांबे (वय ५५) राह. खारघर नवी मुंबई याचा कशोशिने शोध घेऊन ताब्यात घेतले. आरोपीकडे विचारणा केली असता सदरचा गुन्हा केल्याची कबुली दिली तसेच आरोपीकडे अधिक सखोल चौकशी केली असता आरोपी याने रामनगर (डोंबिवली) पोलीस ठाणे गु.र.नं. ७१४/२०२४ भादवी कलम ४२०, ३४ व गुन्हा रजि. नं. ७१६/२०२४ भादवी ४२०, ३४ हा गुन्हा देखील केला असल्याची कबुली दिल्याने विष्णूनगर पोलीस ठाणे व रामनगर पोलीस ठाणे स्तरावरील ३ गंभीर गुन्हे उघडकीस आले. आरोपी यास विष्णूनगर पोलीस ठाणे च्या गुन्ह्यात अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.
सदरची कामगिरी पोलीस उपायुक्त परिमंडळ – ३ कल्याण, सहाय्यक पोलीस आयुक्त कल्याण विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पवार, सपोनी सचिन लोखंडे, पोलीस उपनिरीक्षक दीपविजय भवर, पोलीस हवालदार जमादार, पोलीस हवालदार पाटणकर, पोलीस हवालदार मोरे, पोलीस हवालदार पाटील, पोलीस हवालदार भोसले यांनी केलेली आहे.