भारतीय किसान संघटनेच्या जळगाव जिल्हा मीडिया सेलच्या अध्यक्षपदी हमीद तडवी
ब्युरो चिफ जाकिर तडवी
जळगाव – भारतीय किसान संघटनेचे प्रदेशाध्यक्ष श्री प्रशांत बोरकर यांनी जाहीर केली आहे
श्री हमीद तडवी हे रावेर तालुक्यातील कुसुंबा येथील मीडिया पोलिस टाईम चे मुख्य संपादक असुन कुसूंबा बुद्रुक गावचे रहिवासी आहेत. जळगाव जिल्ह्यामध्ये अनेक वृत्तपत्रांचे तडवी हे काम करीत असून आदिवासी समाजातील एक युवा अनुभवी नेतृत्व आहे. त्यांच्या निवडीबद्दल भारतीय किसान संघटनेचे प्रदेशाध्यक्ष श्री प्रशांत बोरकर, महासचिव श्री शिवाजीराव विसपुते, संजय चौधरी, रामकृष्ण चौधरी, अशोक पाटील, रशीद तडवी, महेश तायडे आदी असंख्य कार्यकर्ते पत्रकार मित्र यांनी अभिनंदन केले आहे.