३० हजारांची लाच घेताना मध्यवर्ती कारागृहातील वैद्यकीय अधिकाऱ्यासह मुख्य वैद्यकीय अधिकारी जाळ्यात

Spread the love

३० हजारांची लाच घेताना मध्यवर्ती कारागृहातील वैद्यकीय अधिकाऱ्यासह मुख्य वैद्यकीय अधिकारी जाळ्यात

नाशिक – ४० हजारांची लाच मागून ३० हजारांच्या लाचेची तडजोड करून ती स्वीकारताना नाशिक मधील मध्यवर्ती कारागृहातील वैद्यकीय अधिकाऱ्यासह मुख्य वैद्यकीय अधिकाऱ्यास लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले आहे. डॉ. आबिद आबू अत्तार (वय ४०) वर्ग- १ पद – मुख्य वैदयकिय अधिकारी, मध्यवर्ती कारागृह नाशिकरोड रा. मध्यवर्ती कारागृह वसाहत, नाशिकरोड व डॉ. प्रशांत एकनाथ खैरनार (वय ४२) वर्ग -२ पद- वैदयकिय अधिकारी, मध्यवर्ती कारागृह नाशिकरोड रा. इंदिरानगर, नाशिक अशी लाच घेणाऱ्या दोघांची नावे आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी कि, यातील तक्रारदार यांचे मित्र हे मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत असून, शासकिय नियमाप्रमाणे ज्या बंदी कैदीचे वय ६५ वर्षा पेक्षा जास्त आहे तसेच ज्या कैदीने १४ वर्षे शिक्षा भोगलेली आहे अशा कैदांना शासनाने नेमून दिलेली समिती सोडून देते. परंतु अशा कैदांना बाहेर सोडण्याकरीता मुख्य वैद्यकिय अधिकारी यांचे फिटफॉर सर्टिफिकेटची गरज असते. म्हणून अत्तार व खैरनार यांनी तक्रारदार यांचे मित्र यांना फिटफॉर सर्टिफिकेट देण्यासाठी तक्रारदार यांचेकडे सुरुवातीला ४०,००० रुपयांची मागणी केली. तडजोड अंती ३०,००० रुपयांची मागणी करून ही लाचेची रक्कम स्वीकारताना त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले.

आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून, त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर, अपर अधीक्षक माधव रेड्डी, अपर अधीक्षक नरेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक स्वप्नील राजपूत, राजेंद्र सानप व संतोष गांगुर्डे यांनी पार पाडली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon