शेअर ट्रेडिंगमधून जादा परताव्याचे आमिष पडले महाग!
पोलीस महानगर नेटवर्क
अंबरनाथ – शेअर ट्रेडिंगच्या माध्यमातून मोठ्या रकमेची गुंतवणूक करण्यास भाग पाडून यापूर्वीही अनेकांना सायबर भामट्यांनी गंडा घातला आहे. तरीही अनेकजण अशा आमिषांना भुलून स्वत:ची फसवणूक करून घेतात. शहरातील एकाला असेच आमिष दाखवून तब्बल ३६ लाख ३८ हजारांना गंडा घातल्याचे उघडकीस आले आहे.
याप्रकरणी अंबरनाथ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सायबर भामट्यांकडून शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग करण्यासाठी सावज शोधतच असतात. व्हॉटसॲपच्या माध्यमातून ते अनेकांना शेअर ट्रेडिंगसंदर्भात मेसेजस् पाठवत असतात. त्यानंतर ते प्रत्यक्ष व्हॉटसॲपवरून वा चॅटिंगद्वारे संपर्क साधून त्यांचा विश्वास संपादन करण्याचा प्रयत्न असतात.असाच प्रकार अंबरनाथ मधील एकाला गेल्या एप्रिल ते जून या महिन्यामध्ये विरय्या महारुद्रय्या पुजार यांच्याशी सायबर भामट्याने व्हॉटसॲपद्वारे संपर्क साधून शेअर ट्रेडिंगच्या माध्यमातून गुंतवणूक केल्यास चांगला परतावा देण्याचे आमिष दाखविले तसेच, त्यानंतर संशयितांनी एका अँपच्या खात्यामधून शेअर्स मार्केटमध्ये पैसे गुंतविल्यास अधिक परतावा मिळण्याचे आमिष दाखवून संशयितांच्या आमिषाला बळी पडून तक्रारदाराने तब्बल ३६ लाख ३८ हजार रुपयांची गुंतवणूक केली. मात्र आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच पुजार यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात मोबाईलधारक आरोपीविरुद्ध गुन्हा रजि.नं. || १०२२/२०२४ माहिती तंत्रज्ञान अधिनियम सन २००० चे कलम ६६ (ड) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्याचा पुढील तपास अंबरनाथ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक (गुन्हे) शिंदे करीत आहेत.