वंचित बहुजन आघाडी बिलोली संवाद बैठक कार्यकर्ता मेळावा, सर्वजीत बनसोडे यांची प्रमुख उपस्थिती 

Spread the love

वंचित बहुजन आघाडी बिलोली संवाद बैठक कार्यकर्ता मेळावा, सर्वजीत बनसोडे यांची प्रमुख उपस्थिती 

मारोती एडकेवार / प्रतिनिधी

सगरोळी – वंचित बहुजन आघाडीचे राज्य उपाध्यक्ष तथा नांदेड जिल्ह्याचे पक्ष निरीक्षक सर्वजीत बनसोडे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली बिलोली तालुक्यातील आजी माजी सर्व पदाधिकारी व बूथ प्रमुख कार्यकर्ते यांचे संवाद बैठक कार्यकर्ता मेळावा दि. १२ जुलै २०२४ रोजी सायंकाळी चार वाजता वंचित बहुजन आघाडी कार्यालय बिलोली येथे संवाद बैठक संपन्न होणार आहे तरी सर्वजण वेळेवर उपस्थित राहावे अशी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष शंकर महाजन व बिलोली तालुका अध्यक्ष धम्मदीप गावंडे वंचित बहुजन युवा आघाडी तसेच महिला आघाडी बिलोली तालुका आवाहन केलेले आहे.

लोकसभा निवडणुकीच्या नंतर वंचित बहुजन आघाडी हे ॲक्शन मोडवर आलेली आहे तरी वंचित बहुजन आघाडी विधानसभेमध्ये आपल्या उमेदवार कसे निवडून येतील यासाठी पूर्ण तयारी करत आहेत प्रत्येक तालुक्यामध्ये बूथबांधानी सवांद दौरा प्रत्येक तालुक्यामध्ये घेतले जात आहे आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी माननीय अँड सर्वजित दादा बनसोडे यांना नांदेड जिल्हा पक्ष निरीक्षक म्हणून निवड केल्यापासून सर्वजीत बनसोडे साहेब हे निवांत न राहता पूर्ण जिल्हा पेन्शन काढून प्रत्येक तालुक्यामध्ये संवाद दौरा राबवण्याचे काम करत आहेत तरी त्यांनी नांदेड जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघांमधील वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार निवडून आल्याशिवाय राहणार नाही असे सर्वजित दादा बनसोडे यांनी आवाहन करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon