सरकारी कामात अडथळा, महिलेला अश्लील शिवीगाळ,बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
पोलीस महानगर नेटवर्क
पुणे – पुण्यात सध्या वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यास पोलिसांना अपयश आले आहे, पण शासकीय कार्यालयातील महिला कर्मचारी देखील सुरक्षित नसल्याचे घडलेल्या घटनेवरून दिसून येत आहे. पुण्यात शासकीय कार्यालयात काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्याला अश्लील शिवीगाळ करुन सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी एका व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार गुरुवारी (दि.२७) दुपारी तीनच्या सुमारास अन्नधान्य वितरण अधिकारी कार्यालय, मध्यवर्ती इमारत पुणे येथे घडला आहे. याबाबत ४२ वर्षीय महिलेने बंडगार्डन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अश्रु नामदेव खवळे (रा.डॉ. राममनोहर लोहीया नगर, पुणे) याच्याविरोधात भा.द. वि. कलम ३५३, ३५४, ५०९ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी शासकीय कार्यालयात काम करतात. गुरुवारी दुपारी फिर्यादी कार्यालयात काम करत असताना आरोपी त्या ठिकाणी आला. त्याने मोठमोठ्याने बोलून सरकारी कामात अडथळा निर्माण केला तसेच फिर्यादी यांच्या अंगावर धावून जात तुला आता सरळ करतो असी धमकी दिली. तसेच अश्लील शिवीगाळ करुन स्त्री मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे.यावरून पोलिसांनी गुन्हा करून पुढील तपास पोलीस करीत आहेत.