पालघर औषध निरीक्षक आरती कांबळी सह एका खाजगी इसम लाचलुचपतच्या जाळ्यात, लाखाची लाच स्वीकारताना अटक

Spread the love

पालघर औषध निरीक्षक आरती कांबळी सह एका खाजगी इसम लाचलुचपतच्या जाळ्यात, लाखाची लाच स्वीकारताना अटक

 विजय घरत / पालघर

पालघर – येथील औषध व सौंदर्य प्रसाधने विक्री प्रकरणी कायद्याचे उल्लंघन केल्याने बंद केलेले मेडिकल स्टोर परत चालू करून देण्यासाठी मेडिकलच्या मालकाकडे एक लाख रुपयांच्या लाचेची मागणी व तिचा स्वीकार केल्याप्रकरणी एका खाजगी इसमासह महिला औषध निरीक्षक पालघर या दोघांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पालघर विभाग पोलीस उपअधीक्षक दयानंद गावडे यांच्या पथकाने रंगेहात अटक करून या दोघांवर पालघर पोलीस ठाण्यात बुधवारी गुन्हे दाखल केले आहेत.

पालघर जिल्ह्यातील नालासोपारा मोरेगाव येथे असलेल्या मेडिकल स्टोअर मध्ये मेडिकलच्या मालकांनी औषध व सौंदर्य विक्री प्रसाधने यांचे उल्लंघन केल्याप्रकरणी त्यांना १४ जून २०२४ रोजी सहाय्यक आयुक्त औषध मंडळाने नोटीस बजावून त्यांचे मेडिकल बंद केले होते. हे मेडिकल परत चालू करून देण्यासाठी सौ. आरती कांबळी औषध निरीक्षक पालघर यांच्या सांगण्यावरून त्यांचा खाजगी इसम कृष्णकुमार तिवारी वय वर्ष (५२) यांनी मेडिकलच्या मालकाकडे एक लाख रुपयांची मागणी केली होती. याबाबत मेडिकल स्टोरच्या मालकाणे दोघांची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पालघर पोलीस उपअधीक्षक दयानंद गावडे यांच्याकडे २१ जून २०२४ रोजी केली होती. या तक्रारीची पडताळणी करून ठाणे परिक्षेत्र, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, पोलीस अधीक्षक सुनील लोखंडे व अप्पर पोलीस अधीक्षक गजानन राठोड तसेच पोलीस अधीक्षक महेश तरडे यांच्या मार्गदर्शनाखाली लाचलुचपत प्रतिबंधक पालघर विभाग पोलीस उपअधीक्षक दयानंद गावडे, पोलीस निरीक्षक शिरीष चौधरी, पोलीस हवालदार अमित चव्हाण, पोलीस हवालदार नवनाथ भगत, पोलीस हवालदार योगेश धरणे, पोलीस हवालदार विलीस भोये, पोलीस हवालदार दीपक सुमडा, महिला पोलीस हवालदार श्रद्धा जाधव, पोलीस शिपाई आकाश लोहरे, पोलीस चालक शिपाई जितेंद्र गवळे या पथकाने बुधवार दि.२६ जून २०२४ रोजी दुपारी नालासोपारा येथे सापळा रचून मेडिकल स्टोरच्या मालकाकडून सौ.आरती कांबळी (औषध निरीक्षक पालघर ) यांच्यावतीने त्यांचा खाजगी इसम कृष्णकुमार तिवारी यांनी एक लाख रुपयांची रोख रक्कम स्वीकारल्या प्रकरणी त्याला रंगेहात अटक करून औषध निर्माता आरती कांबळी व त्यांचा खाजगी खाजगी तिवारी या दोघांवर तुळींज, नालासोपारा पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon