संतापजनक ! सांस्कृतिक पुण्यात अल्पवयीन मुलीवर नराधम वडील, चुलता व चुलत भावाकडून लैंगिक अत्याचार
पोलीस महानगर नेटवर्क
पुणे – सांस्कृतिक आणि विद्येचे माहेरघर म्हणून ओळख असलेल्या पुण्यात दिवसेंदिवस महिला, मुलींवर अत्याचार होत आहेत. गुन्हेगारीमध्ये प्रचंड वाढ होत आहे.कायदा सुव्यवस्था शिल्लक आहे की नाही असा प्रश्न उपस्थित होत आहे. माणुसकीला काळिमा फासणारी अशीच एक घटना मांजरी येथे घडली आहे. एका तेरा वर्षीय अल्पवयीन मुलीवर वडील, चुलता आणि चुलत भावाने बलात्कार केल्याची खळबळजनक घटना पुण्याच्या हडपसर परिसरात असलेल्या मांजरी येथे घडली आहे. हा प्रकार जुलै २०२२ ते २० जून २०२४ या कालावधी दरम्यान घडला असल्याची माहिती समोर आली आहे. पीडित मुलीने याबाबत आईकडे तक्रार केल्यानंतर हा सर्व प्रकार उघड झाला आहे. त्यानंतर वडील चुलत भाऊ आणि चुलत्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकाराने एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी १३ वर्ष १० महिने वयाच्या अल्पवयीन मुलीने फिर्याद दिली आहे. त्यानुसार हडपसर पोलिसांनी भारतीय दंड विधान ३७६, ३७६ (आय), ३२३, ५०६, बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा कलम ४, ६, ८, १२ अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी तिच्या आई, वडील, चुलते, चुलत भाऊ अशा एकत्र कुटुंबात मांजरी मधील घुले नगर परिसरात राहायला आहे. हे कुटुंब परप्रांतीय असून कामानिमित्त पुण्यात राहते. जुलै २०२२ मध्ये तिच्या चुलत भावाने राहत्या घरामध्ये वरच्या खोलीत तिला एकटे गाठले. तिला ‘चल प्यार करेंगे’ असे म्हणाला. तिने त्याला नकार दिला असता त्याने तिला लोखंडी रॉडचा धाक दाखवला. स्वतःचे आणि तिचे कपडे काढले आणि तिच्यावर बलात्कार केला. त्रास झाल्यामुळे तिने आरडाओरडा सुरू केला. स्वतःची कशीबशी सुटका करून घेतली. ती तिथून पळाली. त्याने तिला ही गोष्ट कोणाला सांगितल्यास ‘ठार मारून टाकीन’ अशी धमकी सुद्धा दिली होती. जानेवारी २०२४ मध्ये एके रात्री फिर्यादी मुलगी घरामध्ये झोपलेली असताना. त्यावेळी तिचा चुलता त्या ठिकाणी आला आणि तिच्या अंथरुणामध्ये शिरून तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर काही दिवसांनी पीडित मुलीची आई गावी गेलेली होती. त्यावेळी तिच्या वडिलांनी जबरदस्तीने तिचे चुंबन घेतले आणि तिच्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. पीडित मुलीने वडिलांना विरोध केला असता त्यांनी तिला मारहाण केल्याचे फिर्यादीमध्ये नमूद करण्यात आले. अशा प्रकारे वडील तिला दररोज त्रास देत असल्याचे देखील पीडित मुलीने पोलिसांना सांगितले आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.