भयंकर ! पुण्यात कोयता गँगचा धुमाकूळ; पोलिसांच्या गाडीसह १५ ते २० वाहनांची तोडफोड

Spread the love

भयंकर ! पुण्यात कोयता गँगचा धुमाकूळ; पोलिसांच्या गाडीसह १५ ते २० वाहनांची तोडफोड

पोलीस महानगर नेटवर्क

पुणे – पुण्यात कोयता गँगने पुन्हा डोके वर काढले आहे. वडगावशेरी येथील गणेशनगर परिसरात कोयता गँगने धुमाकूळ घालत हातामध्ये कोयते आणि दगड घेत पोलिसांच्या गाडीसह १५ ते २० वाहनांची तोडफोड केल्याचा प्रकार समोर आला आहे. यामध्ये सहा कार, चार रिक्षा, तीन दुचाकी आणि इतर वाहनांची तोडफोड करण्यात आली आहे. या घटनेने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

सलग दुसऱ्या दिवशी शहरात वाहनांची तोडफोड झाल्याने पोलिसांचा धाक उरला आहे की नाही असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. २१ जून ला सिंहगड रस्त्यावरील किरकटवाडी या ठिकाणी कोयता टोळीने धुमाकूळ घालत वाहनांची तोडफोड केली होती. त्यानंतर मध्यरात्री चंदननगर परिसरातील वडगावशेरीत वाहनांची तोडफोड करण्यात आली आहे. त्यामुळे पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. सततच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पुण्यातील कायदा सुव्यवस्था शिल्लक आहे का? असा सवाल नागरिक करीत आहेत.

पुणे शहरातील अनेक भागात तरुणांच्या टोळ्या हातात कोयता घेऊन दहशत माजवण्याचे प्रकार सर्रास सुरू आहेत. खंडणी वसूल करणे, धमकावणे, दहशत निर्माण करण्यासाठी शहरातील अनेक भागात हे तरुण हातात कोयते घेऊन फिरताना दिसत आहेत. यामुळे नागरिकांमध्ये भीती आहेच शिवाय व्यापाऱ्यांमध्ये देखील चिंता आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon