उल्हासनगरच्या बार मध्ये दारूसोबत चखणा दिला नाही म्हणून राडा, बाटल्या फेकत दारुड्याने घातला हैदोस
योगेश पांडे / वार्ताहर
उल्हासनगर – दारूसोबत चखणा दिला नाही म्हणून बेवड्याने राडा घातला आहे. उल्हासनगरमध्ये हा धक्कादायक प्रकार घडला आहे. चखणा मिळाला नाही म्हणून बिअरच्या बाटल्या फेकत टोळीने हैदौस घातला आहे, याचं सीसीटीव्ही फुटेजही समोर आलं आहे. उल्हासनगरच्या हिमालया रेस्टॉरंट आणि बारवर तीन ते चार जणांच्या टोळीने बिअरच्या बाटल्या फेकल्या. हा सगळा प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. टोळक्याचा हा हैदौस पाहण्यासाठी बघ्यांची गर्दीही झाली होती.
चखणा मिळाला नाही म्हणून आरोपी राजू सरदार आणि त्याच्या साथीदारांनी हॉटेल मॅनेजरला मारहाण केली, तसंच बिअरच्या बाटल्या दुकानावर फेकून मारल्या. याप्रकरणी बार मालकाने पोलीस तक्रार दाखल केली आहे, तसंच ही टोळी कायमच असा त्रास देत असल्याचा आरोपही बार मालकाने केला आहे. तसंच फुटलेल्या बाटल्यांच्या काचा रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांना लागल्याचा दावाही बार मालकाने केला आहे.बार मालकाच्या तक्रारीच्या आधारे पोलीस अधिक तपास करत आहे.