कल्याणमध्ये लग्नाचे आमिष दाखवून तरुणीची फसवणूक; कुणाल पाटीलवर खडकपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

Spread the love

कल्याणमध्ये लग्नाचे आमिष दाखवून तरुणीची फसवणूक; कुणाल पाटीलवर खडकपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

पोलीस महानगर नेटवर्क

कल्याण – कल्याण पश्चिम परिसरात राहणाऱ्या एका २९ वर्षाच्या नोकरदार तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून ठाण्यात राहणाऱ्या एका तरुणाने तब्बल ६० लाख रुपयांना चुना लावला आहे. सदर तरुण- तरुणीची ओळख एका विवाह संस्थेच्या माध्यमातून झाली. गेल्या वर्षभराच्या कालावधीत या तरुणाने पीडित तरुणीला आपण लवकरच लग्न करू, अशी मुक्ताफळे उधळण्यास सुरुवात केली व तरुणीला विश्वासात घेऊन तिला कर्ज घेण्यास भाग पाडले. वेळोवेळी तो तिच्याकडून सतत रकमा घेत होता. यादरम्यान पीडित तरुणीला तिच्या लग्नाबाबत चिंता वाटत होती.आपण कर्ज काढून दिले व वर्ष होत आले तरी हा तरुण आपल्याबरोबर विवाह करत नाही. मात्र सतत पैशाचा तगादा लावत असल्याने, या तरुणीने अखेर खडकपाडा पोलीस ठाण्यात तरुणाविरुद्ध तक्रार केली.

कुणाल संतोष पाटील (रा. हिरानंंदानी, ठाणे) असे या आरोपीचे नाव आहे. जुलै २०२३ पासून हा फसवणुकीचा प्रकार घडला असल्याचे तक्रारीत नमूद आले आहे.सदर तरुणी ही कल्याण तरुणी पश्चिमेतील एका उच्चभ्रूं वस्ती असलेल्या गृहसंकुलात राहते. ही तरुणी नोकरदार असून लग्न करायचे असल्याने तिने विविध वधू-वर सूचक मंडळांमध्ये सुस्वरुप तरुणाची चौकशी सुरू केली होती. वधू वर सूचकच्या माध्यमातून या तरुणीची ओळख गेल्या वर्षी जुलैमध्ये आरोपी कुणाल पाटील याच्या बरोबर झाली. कुणालने तरुणीबरोबर लग्न करायची तयारी दर्शवली. लवकरच लग्न करू, असे आश्वासन दिले. दरम्यानच्या काळात कुणाल पाटील याने विविध कारणे देऊन तरुणीकडून पैशांची मागणी करण्यास सुरुवात केली. लग्न होणार असल्याने तरुणीने स्वत:च्या क्रेडिट कार्ड, आई-वडिलांच्या नावे, मित्र, मैत्रिणींच्या नावे विविध बँकांमधून कर्जाऊ रकमा घेऊन ते पैसे होणारा पती कुणाल पाटील यास दिले. या कर्जाऊ रकमेचे सर्व हप्ते आपण स्वत: फेडू, असे आश्वासन कुणालने पीडित तरुणीला दिले होते. त्यामुळे तरुणी निश्चिंत होती. अशाप्रकारे कुणालने तरुणीकडून वर्षभराच्या कालावधीत ५९ लाख ५६ हजार रुपये उकळले. तरुणीने हे पैसे कुणालला ऑनलाईन माध्यमातून त्याच्या बँकेत पाठविले होते. घेतलेल्या कर्जाऊ रकमांचे हप्ते सुरू झाले. त्याच्यावरील व्याज वाढत चालले म्हणून तरुणीने या रकमा भरण्यासाठी कुणाल सांगितले, मात्र त्यावेळी विविध कारणे देऊन या रकमा भरण्यास टाळाटाळ करू लागला. पीडित तरुणीने त्याला आपण लग्न कधी करणार असे प्रश्न विचारणे सुरू केल्यावर त्यावरही कुणाल टाळाटाळ करू लागला. कालांतराने कुणालने पीडित तरुणीच्या संपर्काला प्रतिसाद देणे बंद केले. ज्यांच्याकडून कर्ज घेतले होते ते मित्र दारात येऊ लागले यामुळे प्रचं वाद वाढू लागले. कुणालने आपली फसवणूक केल्याचे लक्षात आल्याने व आपल्याला लग्नाचे आमिष दाखवून आपल्याला कर्जाच्या खाईत लोटून पळून गेल्याने अखेर तरुणीने बुधवारी खडकपाडा पोलीस ठाण्यात तक्रार केली. या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक प्रकाश मुकादम पुढील तपास करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon