कळव्यात अनधिकृत इमारतीचा स्लॅब कोसळून ३ जण जखमी, पालिका प्रशासनानं इमारत केली रिकामी
योगेश पांडे /वार्ताहर
ठाणे – ठाण्यातील कळवा इथं अनधिकृत इमारतीचा स्लॅब कोसळल्याची घटना घडलीय. ही इमारत ३० ते ३५ वर्ष जुनी असल्याची माहिती मिळाली आहे. दरम्यान, या दुर्घटनेत ३ जण जखमी झाले असून, त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. कळव्यातील ओम कृष्णा अपार्टमेंटमध्ये ही घटना घडलीय. कळव्यातील ओम कृष्णा अपार्टमेंटमधील, तिसऱ्या मजल्यावरील इमारतीचा स्लॅब हा स्लॅब दुसऱ्या मजल्यावर कोसळल्याची घचना घडली आहे. दुसऱ्या मजल्यावरील कुटुंब जेवण करत असतानाच इमारतीचा स्लॅब कोसळला. यामध्ये तीन जण जखमी झाले आहेत. त्यांच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
दरम्यान, सदरच्या घटनेनंतर महापालिका प्रशासनाने सावध पवित्रा घेतला आहे. महापालिकेने सदर इमारत रिकामी केली आहे. तसेच इमारतीच्या बाहेर धोका पट्टी लावण्यात आली आहे. रहिवाशांनी तात्पुरती त्यांची राहण्याची व्यवस्था आपापल्या स्वतःच्या नातेवाईकांकडे केली आहे.