नाशिकमध्ये गुन्हेगारीचा कहर; डीजेचा आवाज कमी करण्यावरून माजी नगरसेविकेच्या पतीवर प्राणघातक हल्ला
पोलीस महानगर न्यूज नेटवर्क
नाशिक – नाशिक परिसरात पुन्हा एकदा गुन्हेगारीने डोके वर काढले आहे. दिवसेंदिवस गुन्हेगारी वाढत चालली आहे. मालेगाव येथील माजी महापौरांवर गोळ्या झाडल्याची घटना ताजी असताना रस्त्यावर वाढदिवस साजरा करणाऱ्या तरुणांना हटकल्यात आल्याने माजी नगरसेविकेच्या पतीसह अन्य तिघांवर धारधार शस्त्राने वार केल्याची घटना घडली आहे. नाशिकरोड परिसरात मध्यरात्री ही घटना घडली आहे.
याप्रकरणी सकाळ पर्यंत गुन्हा दाखल झाला नव्हता. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहे. रस्त्यावर वाढदिवस साजरा करून गोंधळ घालणाऱ्यांना हटकल्याने जीवघेणा हल्ला केल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. हल्लानंतर तणावाचे वातावरण पसरले आहे. नाशिकमध्ये पुन्हा एकदा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर झाला आहे, पोलीसांना आव्हान देत सर्रासपणे गावगुंडचा धुमाकूळ सुरू आहे. अचानक घडलेल्या घटनेनं नाशिकरोड परिसरात खळबळ उडाली होती. जखमींना तत्काळ उपचारासाठी रुग्णालयात हलविण्यात आल्यानंतर रात्री उशिरापर्यंत गर्दी होती. त्यानंतर रात्री उशिरा दोघा हल्लेखोरांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.