जीवे मारण्याची धमकी देत २१ वर्षीय तरुणीवर तब्बल ३ महिने अत्याचार
पोलीस महानगर न्यूज नेटवर्क
अकोला – अकोला परिसरात दिवसेंदिवस गुन्हेगारीचा विळखा पडत आहे.शहरात गुन्हेगारीने डोके वर काढले असून अशीच एक घटना वाशीम परिसरात घडली आहे. तरुणीला घरातून बळजबरीने उचलून नेऊन अकोला शहरातील वाशिम बायपास रोडवरील एका खोलीत बलात्कार केला. तीन महिने तिला जीवे मारण्याची धमकी देऊन तिच्यावर बलात्कार करण्यात आला. पीडितेच्या तक्रारीनंतर सदर प्रकरण उघडकीस आले. एका २१ वर्षीय तरुणीवर दोन नराधमाने ३ महिने लैंगिक अत्याचार केल्याचा संतापजनक घटना अकोला जिल्ह्यातून समोर आली आहे. या घटनेने घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान पीडितेने दिलेल्या तक्रारिवरून आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला असून १३ दिवस उलटूनही आरोपी अद्याप मोकाट आहेत. यामुळे आता पीडितेने जिल्हा पोलिस अधीक्षकांची भेट घेऊन कैफियत मांडली आहे. पीडितेच्या तक्रारीवरून बार्शी टाकळी पोलिस ठाण्यात आरोपींविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हे दाखल केले आहेत. अत्याचार करणाऱ्या आरोपींवर ३६३, ३७६, (२)(एन), ३७७, ३२३, ५०६ आणि ३४ नूसार गुन्हे दाखल केले आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तरुणी ५ डिसेंबर २०२३ रोजी शौचालयाला जात असताना दोन तरुणांनी तिला जीवे मारण्याची धमकी देऊन तिला आपल्यासोबत घेऊन गेले. नराधमांनी अकोल्यातील वाशिम बायपास परिसरातील खोलीत नेऊन चाकूच्या धाकावर तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर दोघांनी तिचे फोटो काढत तिला ब्लॅकमेल करत तसेच कुटुंबासह तिला जीवे मारण्याची धमकी देत दोघांकडून वारंवार लैंगिक अत्याचार करण्यात आला. २६ मार्च २०२४
पर्यत हा सर्व प्रकार सुरूच होता. २७ मार्च रोजी पीडितेने त्यांच्या तावडीतून सुटका करत घर गाठलं व सर्व प्रकार नातेवाईकांना सांगितला. त्यानंतर पीडितेने कुटुंबासह बार्शी टाकळी पोलीस ठाणे गाठून तक्रार नोंदवली. मात्र त्यानंतरही पोलिसांनी काही कारवाई न केल्याने दोघे पीडितेच्या घरासमोर यायचे आणि जिवे मारण्याची धमकी द्यायचे. या त्रासाला कंटाळून पीडितेने पुन्हा ११ मे रोजी पुन्हा पोलीस ठाण्यात तक्रार दिली. अत्याचार करणाऱ्या तरुणांपैकी एकाची तिच्याशी ओळख होती. या प्रकरणात चौघांवर विविध कलमान्वये गुन्हा दाखल झाला असून यात एका महिलेचाही समावेश आहे. या प्रकरणात पोलिसांनी सांगितले की, पीडित तरुणीच्या तक्रारीनुसार चौघांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. प्रकरणाचा सखोल तपास केला जाणार असून दोषींवर कठोर कारवाई केली जाईल.