पुणे हिट अँड रन प्रकरणात मोठी अपडेट!

Spread the love

पुणे हिट अँड रन प्रकरणात मोठी अपडेट!

दोघांना चिरडणाऱ्या अल्पवयीन मुलाच्या वडिलांवर कारवाई, पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची माहिती

योगेश पांडे / वार्ताहर 

पुणे – पुण्याच्या हिट अँड रन प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. या प्रकरणाची पुणे पोलीस आयुक्तांनी गंभीर दखल घेतली आहे. पुणे अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीच्या वडिलांवर कारवाई होणार आहे. पुण्यात कल्याणीनगर भागात मध्यरात्री आलिशान कारने दुचाकीसह अनेक वाहनांना धडक दिल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात तरुण तरुणीचा जागीच मृत्यू झाला होता. ही कार पुण्यातील एका प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिकाची असल्याचं बोललं जातंय. अल्पवयीन मुलाने मद्यधुंद अवस्थेत धडक दिल्यामुळे दोन जणांचा जागीच मृत्यू झाला. यामध्ये एका तरुणीसह तरुणाचा समावेश आहे. हा अपघात रविवारी मध्यरात्री अडीच वाजण्याच्या सुमारास कल्याणीनगर येथे घडला. या प्रकरणी येरवडा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आली असून, आता अल्पवयीन मुलाच्या वडिलांवर देखील गुन्हा दाखल होणार आहे.

पुणे हिट अँड रन प्रकरणात अल्पवयीन मुलाला मद्य देणाऱ्यावर सुद्धा कारवाई केली जाणार आहे. १७ वर्षीय अल्पवयीन तरुणाने बेदरकारपणे गाडी चालवत २ जणांचा जीव घेतला होता. या अल्पवयीन तरुणाच्या वडिलांवर गुन्हा दाखल होणार असल्याची माहिती पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली आहे. कलम ७५ आणि कलम ७७ जुवेनाईल जस्टिस ॲक्ट प्रमाणे कारवाई केली जाणार आहे. कल्याणी नगर भागात झालेल्या अपघाताची पुणे पोलिसांकडून पाहणी केली. आरोपीला ताब्यात घेतला असून त्याच्यावर येरवडा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गाडी २०० च्या स्पीडने होती अशी माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली. अश्विनी कोष्टा, अनिस अवधिया या दोघांचा मृत्यू झाला हे दोघं राजस्थानचे राहणारे होते. पुण्यात कल्याणी नगर परिसरात एका आलिशान सुपरकारने रात्री अडीच वाजताच्या सुमारात दोघांना उडवलं. यात त्यांचा मृत्यू झाला. पबमधून पार्टी करुन परत येत असताना हा अपघात झाला. या बार आणि पबवरुन परतताना अनेक तरुण मद्यप्राशन करुन गाड्या चालवतात आणि या गाड्यांचा अति वेग असतो. हाच वेग आता तरुणांच्याच जीवावर बेतताना दिसत आहे.

प्रत्यक्षदर्शींनी माहिती देताना सांगितलं की, पोर्शे कारने भरधाव वेगात दुचाकीवरून जाणाऱ्या तरुण-तरुणीला उडवलं. पोर्शे कारनं धक्का देताच दुचाकीवरील तरुण पुढे असणाऱ्या कारवर आदळला. तर तरुणी हवेत उंच उडाली आणि रस्त्यावर पडली. तरुणीचे डोके रस्त्यावर आपटल्याने रक्तस्राव होऊन जागीच गतप्राण झाली. तर तरुणाचाही मृत्यू झाला. दरम्यान, तरुणी तरुणीला धडक देण्याआधी कार इतर वाहनांना धडक देऊन आल्याचंही प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं. दुचाकी रस्त्याच्या एका बाजूने जात असताना मागून आलेल्या कारने त्यांना उडवलं. या अपघातानंतर पोर्शे कारमधील एअर बॅग्ज उघडल्या. त्यानंतर कार बाजूला थांबवण्यात आली. कारमध्ये तिघेजण होते अशीही माहिती समोर येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon