धीरज वाधवान यांना सीबीआय कडून अटक, ३४ हजार कोटींचा गैरव्यवहार केल्याचा आरोप
योगेश पांडे / वार्ताहर
मुंबई – डीएचएफएल बँक गैरव्यवहार प्रकरणी धीरज वाधवान यांला सीबीआयने अटक केली आहे. त्यांच्यावर ३४ हजार कोटींचा गैरव्यवहार केल्याचा आरोप आहे. वाधवान यांच्या विरोधात सीबीआयने २०२२ मध्ये आरोपपत्र दाखल केलं होतं. या आधी ईडीकडून वाधवान यांना येस बँक गैरव्यवहार प्रकरणात अटक करण्यात आली होती. डीएचएफएल बँक गैरव्यवहार प्रकरणी केंद्रीय अन्वेषण ब्युरोने मोठी कारवाई केली आहे. सीबीआयने मंगळवारी धीरज वाधवान यांना ३४०००कोटींच्या डीएचएफएल बँक घोटाळा प्रकरणी अटक केली. २०२२मध्ये या प्रकरणाच्या संबंधात केंद्रीय तपास यंत्रणांकडून वाधवान यांच्यावर आधीच आरोपपत्र दाखल करण्यात आले होते. धीरज वाधवान यांना यापूर्वी येस बँक घोटाळा प्रकरणी अटक करण्यात आली होती आणि ते जामिनावर तुरुंगाबाहेर होते. दरम्यान, आता पुन्हा त्यांना ३४ हजार कोटींचा गैरव्यवहार केल्याच्या आरोपात सीबीआयने अटक केली आहे.
फेब्रुवारी २०२४ मध्ये, सिक्युरिटीज एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडियाने म्हणजेच सेबीने २२ माजी डीएचएफएलचे प्रमोटर्स धीरज वाधवान आणि कपिल वाधवान यांची बँक खाती तसेच शेअर्स आणि म्युच्युअल फंड होल्डिंग्स एकत्र करत लाख रुपयांची थकबाकी वसूल केली होती. वाधवान बंधूंनी नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी गेल्या वर्षी जुलैमध्ये त्यांच्यावर लावण्यात आलेला दंड भरण्यात अयशस्वी झाल्यानंतर बाजार नियामक कडून हे पाऊल उचलण्यात आलं होतं. सीबीआयने डीएचएफएल आर्थिक घोटाळा प्रकरणाची नोंद केली होती, ज्यामध्ये १७ बँकांची फसवणूक केल्याचं समोर आलं होतं. डीएचएफएल कडून ३४,००० कोटी रुपयांची कथित फसवणूक करण्यात आली, त्यामुळे हा देशातील सर्वात मोठा बँक घोटाळा आहे. या प्रकरणी सीबीआयने डीएचएफएलचे माजी संचालक धीरज वाधवान यांना ३४ हजार कोटींच्या बँक फसवणूक प्रकरणी अटक केली आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.