मुंबई पोलिसांकडून राजस्थानमधील बेकायदेशीर एमडी ड्रग्ज फॅक्टरीचा भंडाफोड
मुंबई पोलिसांच्या या कारवाईत, १०७ कोटी रुपये किंमतीचे ड्रग्ज जप्त, ४ जणांना अटक
योगेश पांडे / वार्ताहर
मुंबई – मुंबई पोलिसांनी मोठी कारवाई करत राजस्थानमधील जोधपूर येथील बेकायदेशीर एमडी ड्रग्ज फॅक्टरीचा भंडाफोड केला. मुंबई पोलिसांनी येथून सुमारे १०७ कोटी रुपयांचे ड्रग्ज जप्त केला. याप्रकरणी पोलिसांनी चार जणांना अटक केली असून पुढील कारवाईला सुरुवात केली आहे. मुंबई पोलिसांच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार, मुंबई पोलिसांच्या एका पथकाने राजस्थानमधील जोधपूर येथील एमडी ड्रग्जच्या एका बेकायदेशीर कारखान्याचा पर्दाफाश केला, ज्याची किंमत १०७ कोटी रुपये आहे. याप्रकरणी मुंबई पोलिसांनी पुढील चौकशीला सुरुवात केली आहे.
साकीनाका पोलिसांच्या पथकाने जोधपूरमधील एमडी ड्रग्स कारखान्याचा शोध घेतला आणि तेथून ड्रग्ज जप्त केले. या बेकायदेशीर ड्रग्ज फॅक्टरीचे मुंबईसह देशाच्या इतर भागांशीही कनेक्शन असावे, असा पोलिसांना संशय आहे. मुंबई पोलिसांची ड्रग्ज माफियांविरोधातील ही मोठी कारवाई आहे. पुढील तपास सुरू असल्याचे मुंबई पोलिसांनी सांगितले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जोधपूरमधील मोगरा येथून मुंबईला मोठ्या प्रमाणात ड्रग्जचा पुरवठा केला जात असल्याची माहिती मुंबई पोलिसांना मिळाली. त्यानंतर मुंबई पोलिसांनी सापळा रचून जोधपूर येथील एमडी ड्रग्ज फॅक्टरीचा भंडाफोड केला. गेल्या अनेक दिवसांपासून मुंबई पोलिसांकडे तक्रारी येत होत्या.