उद्धव ठाकरेंचा केजरीवाल होईल, भाजप आमदार प्रसाद लाड यांचा इशारा
योगेश पांडे / वार्ताहर
मुंबई – लोकसभा निवडणुकीमुळे राजकीय वातावरण तापलं आहे. निवडणुकीमुळे राजकीय नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. उद्धव ठाकरेंकडून राज्यभरातील दौऱ्यांमधून महायूतीवर जोरदार टीका केली जात आहे. याचदरम्यान भाजप नेते , आमदार प्रसाद लाड यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जहरी टीका करत मोठा इशारा दिला आहे. उद्धव ठाकरेंचा केजरीवाल होईल, असा इशारा भाजप नेते प्रसाद लाड यांनी दिला आहे. भाजप नेते प्रसाद लाड हे सध्या माढ्याच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान प्रसाद लाड यांनी पत्रकार परिषद घेत उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली. यावेळी प्रसाद लाड म्हणाले, ‘देशात अरविंद केजरीवाल वाचले नाहीत. त्याप्रमाणे उद्धव ठाकरे वाचणार नाहीत. उद्धव ठाकरेंचा अरविंद केजरीवाल होईल’.
मेलेल्या माणसाच्या टाळू वरचे लोणी खाण्याचं काम उद्धव ठाकरे यांनी केलं. मोहिते पाटील यांना जवळ केलं, ही आमची चूक होती मी माफी मागतो. शिवसेनेने जाहिरातीमध्ये पॉर्नस्टार वापरला. युवराजांना हे नवीन नाही, संध्याकाळ झाली की तेच आहे, त्यामुळे त्यांना ते नवीन नाही. मशालीची आईस्क्रीम होईल, तुतारी गळून पडेल. पंजा गळून पडेल अशी अवस्था महाविकास आघाडीची होईल, अशी टीका प्रसाद लाड यांनी केली. संजय राऊत यांच्याकडे आता बोलायला काही नाही. त्यांच्याकडे आता बोलायला काही नाही. ते आता बिथरलेले आहेत. देवेंद्रजी काल म्हणाले, एखाद्या व्यक्तीसोबत राहिल्याने त्यांचे गुण आणि अवगुण हे अंगी येतात. असे संजय राऊत यांचे अवगुण हे उद्धव ठाकरे यांच्यामध्येही पाहायला मिळतात, अशी टीका लाड यांनी केली