पनवेलमध्ये पिकअप टेम्पो चोरणारा सराईत गुन्हेगार जेरबंद; ११ गुन्हे उघडकीस

Spread the love

पनवेलमध्ये पिकअप टेम्पो चोरणारा सराईत गुन्हेगार जेरबंद; ११ गुन्हे उघडकीस

पोलीस महानगर नेटवर्क

नवी मुंबई – पनवेलमध्ये चोरट्याचा सुळसुळाट झाला आहे. दररोज चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. अशीच एक घटना पनवेलमध्ये घडली आहे. पनवेल परिसरातून टेम्पो पिकअप चोरणाऱ्या एका सराईत गुन्हेगारास पनवेल तालुका पोलिसांनी केले गजाआड केले असून ११ गुन्हे आणले उघडकीस आणले आहेत.

रफिक शेख यांचे दुकानासमोर, सोमाटणे रोड, कोन गाव याठिकाणी त्यांचा पिकअप टेम्पो क्र- एम एच ४६ इ ५४२३ हा कोणीतरी अज्ञात चोरट्याने त्याच्या यांच्या संमतीशिवाय चोरून नेला म्हणून पनवेल तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पाटील,यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय गळवे, स.पो.नी. निलेश फुले, हवालदार विजय् देवरे, महेश धुमाळ, सुनिल कुदळे, आकाश भगत, पोशी भीमराव खताळ यांनी गुन्ह्याचे गांभीर्य लक्ष्यात घेऊन त्या अनुषंगाने कोनगाव, जेएनपीटी रस्ता, कळंबोली, दिघा, पडघा, खडवली, वाडा, जवार, कल्याण ठिकाणवरील तब्बल एकूण ३७ ठिकाणाच्या सीसीटीव्ही ची पाहणी करण्यात आली.

सदर सीसीटीव्ही फुटेजमध्ये चोरीस गेलेला पिकअप व चोरटा याचा मागोवा घेत पोलिस् पथक खडवली, जि. ठाणे येथे संशयित चोरट्या आरोपीची सीसीटीव्ही फूटेज व गुप्त बातमी दारा मार्फत माहिती प्राप्त करुन पिकअप टेम्पो चोरी करणाऱा चोरट्याचा शोध सुरु केला असता सदर गुन्हा हा सराईत गुन्हेगार आरोपी सतीश सेहगल पुजारी (वय ४९ वर्षे, रा. ०२ बेंझर चाल, मरोळ मरोशी रोड, अंधेरी) याने केल्याची माहिती मिळाली. सदर इसमास पनवेल तालुका पोलिसांनी ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने गुन्हा केल्याची कबुली दिली.

सदर आरोपीने चोरी केलेला पिकअप याचे नंबर प्लेट बदलून त्याने सदर चा पिकअप हा राज्यस्थान येथील आरोपी इन्साफअली लतीफ गाडेत  (वय ५५ वर्षे, रा. नागौर, राज्य-राज्यस्थान) यास बाजारभावापेक्षा कमी दरात विकला. दोन्ही आरोपींकडून गुन्ह्यतील चोरीस गेलेला मो.पिकअप १,६०,०००/- रु. किंमतीचा मुदेमाल जप्त करण्यात आला असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करून भा.द.वि. कलम ४६५,४६६,४६७, ४११ अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. सदर आरोपीविरोधात डायघर, वाकोला, वडाळा, ओशिवरा, साकीनाका, धारावी डिसीबी सीआयडी अशा विविध पोलीस ठाण्यांमध्ये ११ गुन्हे दाखल असून पोलीस अधिक तपास करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Right Menu Icon