डोंबिवलीत ट्रेडिंगचे आमिष दाखवून १८ लाखाची ऑनलाईन फसवणूक, गुन्हा दाखल

Spread the love

डोंबिवलीत ट्रेडिंगचे आमिष दाखवून १८ लाखाची ऑनलाईन फसवणूक, गुन्हा दाखल

पोलीस महानगर नेटवर्क

डोंबिवली – फेसबुकवर ट्रेडिंगचे आमिष दाखवून ६ मार्च ते १२ एप्रिल दरम्यान सतीश बालकृष्णन यांची १८ लाख रुपयांची ऑनलाईन फसवणूक केल्याचा प्रकार उघड झाला. याप्रकरणी विष्णूनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होऊन पोलीस अधिक चौकशी करीत आहेत. डोंबिवली पश्चिम, शास्त्रीनगर परिसरात राहणारे सतीश बालकृष्णन यांना अनोळखी मोबाईलधारक महिला व इसम यांनी फेसबुकवर इनहाईट ग्रुप जॉईन असा मेसेज केला व त्यानंतर टेलिग्राम ग्रुपमध्ये ऍड करून त्यातील ट्रेडींगमध्ये१ टक्का नफा मिळण्याचे आमिष दाखवून फिर्यादी यांना आरोपींनी दिलेल्या बँक खात्यात एकूण १८ लाख रुपये रक्कम ऑनलाईन पाठविण्यास सांगून ती परत न करता त्यांची फसवणूक केली.

सदर फसवणूक प्रकरणी फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात मोबाइलधारक आरोपीविरुद्ध गुन्हा रजि. नं. || ४५८/२०२४ माहिती तंत्रज्ञान अधिनियम सन २००० चे कलम ६६ (क), ६६ (ड) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक गमे हे करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon