लाचखोर पोलीस निरिक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात; संतप्त नागरिकांची पोलीस गाडीवर दगडफेक
योगेश पांडे / वार्ताहर
नंदूरबार – आरोपीला अटक न केल्याप्रकरणी लाच मागणारे नवापूर पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे यांना नाशिक एसीबीकडून अटक करण्यात आली आहे.पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे यांनी गुजरात राज्यात एका आरोपीवर गुन्हा असल्याने या आरोपीला अटक न करण्यासाठी तीन लाखाची मागणी केली होती. दरम्यान अटकेची कारवाई केली असताना जमावाकडून अधिकाऱ्याविरोधात घोषणाबाजी करण्यात आल्या. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस निरीक्षक वारे यांनी आरोपीवर अटकेची कारवाई न करण्याकरता तीन लाख रुपयांची लाच मागितली होती. यातील १ लाख दिले गेले होते ५० हजार दिले जात असताना नाशिक एसीबीने पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वारेंना रंगेहाथ अटक केली.
पोलीस निरीक्षकावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई करताच शहरातील नागरिकांनी पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे यांच्याविरोधात घोषणाबाजी करत पोलीस वाहनावर दगडफेक केली. पोलीस निरीक्षक वारे हे वारंवार खोटे चुकीचे गुन्हे दाखल करत होते. तर भ्रष्ट अधिकारी होते, त्यामुळे यांच्यावर झालेली कारवाई योग्यच असून या जमावाने शासकीय वाहनांवर दगडफेक करून आपला रोष व्यक्त केला. पोलीस निरीक्षक वारे यांना सापळा रचून अटक करण्यात आली.
गुन्हा दाखल करण्यासाठी लाच मागणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यावर कारवाई करण्याची घटना काही दिवसापूर्वी दहिसमध्येही घडली होती. गुन्हा दाखल न करण्यासाठी तसेच गोठवलेले बँक खाते पुन्हा सुरू करून देण्यासाठी १० लाखांची मागणी करणारा दहिसर पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षकाला एसीबीने अटक केली. लाचलूचपत प्रतिबंधक विभागाने या कारवाईत दहिसर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक राजेश प्रकाश गुहाडे याच्यासह लाचेच्या रक्कमेपैकी एक लाख स्वीकारणारा खाजगी व्यक्ती गौरव गम शिरोमणी मिश्रा या दोघांविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.