धक्कादायक ! ‘तुला पिक्चर दाखवतो टॉयलेटमध्ये चल म्हणत १० वर्षाच्या मुलावर लैंगिक अत्याचार

Spread the love

धक्कादायक ! ‘तुला पिक्चर दाखवतो टॉयलेटमध्ये चल म्हणत १० वर्षाच्या मुलावर लैंगिक अत्याचार

पोलीस महानगर नेटवर्क

पुणे – पुणे शहरात दिवसेंदिवस गुन्हेगारी वाढत चालली आहे.  पुण्यातील वाघोली येथील एका नामांकित शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यावर शाळेतील शिपायाने लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी पुण्यातील लोणीकंद पोलीस ठाण्यात पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पिडीत मुलाच्या आईने या संदर्भात पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा १० वर्षाचा मुलगा वाघोली परिसरातील एका नामांकित शाळेत शिकतो. १९ एप्रिल रोजी फिर्यादी यांनी मुलाला सकाळी सात वाजता शाळेत सोडले. त्यानंतर आरोपीने पिडीत मुलाला त्याचे नाव विचारले. त्याच्यासोबत गोड बोलून ‘तू मुव्ही बघतो की नाही’ अशी विचारणा केली. मुलाने हो असे उत्तर दिल्यानंतर आरोपीने ‘मी तुला एक फिल्म दाखवतो टॉयलेटमध्ये चल’ असे म्हटले. त्यावेळी मुलाने त्याला नकार दिला. मात्र, आरोपीने ‘इथले सर्व कॅमेरे बंद आहेत, तू काळजी करु नकोस कोणाला काही समजणार नाही’ असं सांगितलं आणि त्याच्यावर जबरदस्ती करू लागला. तेव्हा पिडीत मुलाने त्याच्या तावडीतून आपली सुटका करुन घेत तेथून पळ काढला व क्लासमध्ये जाऊन बसला. काही वेळाने आरोपी पुन्हा वर्गात आला. ‘तुला टॉयलेटमध्ये यायचे नाही तर तुला इथेच फिल्म दाखवतो’ असे बोलून त्याने खिशातून मोबाईल काढला. मोबाईल मध्ये एक अश्लील वेबसाईट दाखवली त्यावेळी पीडित मुलाने मोठ्याने आरडा ओरडा करण्यास सुरुवात केली. त्यावेळी आरोपीने कोणाला काही सांगू नको अशी धमकी दिली. याप्रकरणी पुढील तपास लोणीकंद पोलीस करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon