कोंबडा करुन टायरमध्ये टाकून मारेन` पोलिसांच्या धमकीला घाबरून तरुणाची आत्महत्या
पोलीस महानगर नेटवर्क
विरार – विरारमध्ये कौटुंबिक वादातून २७ वर्षीय तरुणानं गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. पतीपत्नीचा वाद पोलिसांनी समझोत्याने न मिटवता, पत्नीचे एकतर्फी ऐकून पोलिसांनी त्रास दिल्याचा आरोप करत तरुणाने मृत्यूपूर्वी व्हिडीओ बनवून आत्महत्या केली. तरुणाच्या आत्महत्येनंतर नातेवाईकांनी विरार पोेलीस स्थानकाबाहेर आंदोलन करत त्रास देणाऱ्या पोलीसा विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.
आत्महत्येपूर्वी त्याने एक चित्रफीत तयार केली होती. पत्नीने खोटी तक्रार दिली होती. शिवाय सुनील पवार नामक पोलिसाने टायरमध्ये घालून मारण्याची धमकी दिल्याने आपण आत्महत्या करत असल्याचे या चित्रफितीत त्याने म्हटले होते. अभयने ही चित्रफीत त्याच्या सर्व नातेवाईकांना पाठवली होती. त्यामुळे शनिवारी रात्री विरार पोलीस ठाण्यात संबंधित पोलिसाविरोधातील कारवाईची मागणी अभयच्या नातेवाईकांनी लावून धरली होती.
विरार पुर्वेच्या मनवेलपाडा येथे अभय पालशेतकर (२८) हा पत्नी आरोही पालशेतकर (२५) हिच्यासोबत रहात होता. ११ महिन्यांपूर्वी त्यांचे लग्न झाले होते. त्यांच्यात कौटुंबिक वाद होते. शनिवारी पत्नीने पोलिसात तक्रार दिल्यानंतर पोलिसांना अभयला बोलावून १४९ अंतर्गत नोटीस देऊन समज दिली होती. नंतर घरी आल्यावर अभयने घरातील हॉलच्या छताला साडीच्या सहाय्याने गळफास लावून आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी त्याने एक चित्रिफत तयार केली होती. पत्नीने खोटी तक्रार दिली तर सुनिल पवार नामक पोलिसाने टायर मध्ये घालून मारण्याची धमकी दिल्याने मी आत्महत्या करत असल्याचे या चित्रफितीत त्याने सांगितले. ही चित्रफित सर्व नातेवाईकांना पाठवली होती. याप्रकरणी विरार पोलीस अधिक तपास करीत आहेत.