मुंबई विद्यापीठातील कलिना कॅम्पसमधील ४० पेक्षा जास्त विद्यार्थिनींना अन्नातून विषबाधा; युवासेनेकडून चौकशीची मांगणी

Spread the love

मुंबई विद्यापीठातील कलिना कॅम्पसमधील ४० पेक्षा जास्त विद्यार्थिनींना अन्नातून विषबाधा; युवासेनेकडून चौकशीची मांगणी

योगेश पांडे / वार्ताहर 

मुंबई – मुंबई विद्यापीठामधील कलिना कॅम्पस येथील नूतन मुलींच्या वसतिगृहात ४० पेक्षा अधिक विद्यार्थिनींना अन्नातून विषबाधा झाली आहे. युवासेनेने या प्रकरणाच्या चौकशीची मागणी केली आहे. विषबाधा पालिकेकडून होणाऱ्या दूषित पाणीपुरवठ्यामुळे झाली की, तेथे लावण्यात आलेल्या वॉटर कुलरची स्वच्छता न राखल्यामुळे झाली याची चौकशी करण्यात यावी, असं निवेदन युवासेनेकडून कुलगुरु प्रा.(डॉ.) रविंद्र कुळकर्णी यांना ई मेल द्वारे पाठवण्यात आलं आहे. युवासेना पदाधिकारी यांनी प्रत्यक्ष पाहणी करुन आढळलेल्या त्रुटींची माहिती दिली. त्यानुसार येथील पाण्याची तपासणी करण्यात आली आहे. त्यांचा रिपोर्ट आज दिला जाणार आहे. तसेच पाच पैकी फक्त तीनच कुलर वापरात आहे. उर्वरीत दोन कुलर अजुन कार्यान्वित नाही, तर ते दोनही कुलर तातडीने वापरासाठी घेण्याच्या सूचना अभियंता विभागास देण्यात आल्या आहेत.

विद्यार्थ्यांना तातडीने औषधोपचार मिळावा. यासाठी किमान एक डॉक्टर आरोग्य केंद्रात उपलब्ध असावा अशी व्यवस्था करण्यात यावी अशा उपाय योजना तातडीने करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. युवासेना माजी सिनेट सदस्यांनी व पदाधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली. त्यांनी वॉर्डन डॉ. मधुरा कुलकर्णी तसेच अभियंता आणि बाधीत विद्यार्थिनींची भेट घेतली आहे. मुंबई विद्यापीठामधील ४० पेक्षा जास्त विद्यार्थिनींना अन्नातून विषबाधा झाल्याची घटना घडली आहे. या प्रकारामुळे विद्यापीठ प्रशासनामध्ये मोठी खळबळ उडाली होती. नेमक्या कोणत्या कारणामुळे विद्यार्थिनींना अन्नातून विषबाधा झाली, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. याप्रकरणी सखोल चौकशी करण्याची मागणी युवासेनेने केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Right Menu Icon