दहिसर पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक राजेश गुहाडे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात; १ लाख स्वीकारताना साथीदारासह अटक

Spread the love

दहिसर पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक राजेश गुहाडे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात; १ लाख स्वीकारताना साथीदारासह अटक

पोलीस महानगर नेटवर्क

मुंबई – दहिसर पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक राजेश गुहाडे यांच्या वतीने एक लाख रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या गौरव मिश्रा या दलालाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांच्या कंपनीच्या नावे असलेले बँक खाते गोठविले असल्याने तक्रारदार यांनी बँकेत जावून चौकशी केली. बँकेतील कर्मचाऱ्यांनी तक्रारदार यांना दहीसर पोलीस ठाण्यात तपास अधिकारी पोलीस उपनिरीक्षक राजेश प्रकाश गुहाडे यांचा मोबाईल क्रमांक देवून अधिक चौकशी करण्यास सांगितले. त्यानुसार तक्रारदार यांनी गुहाडे यांना संपर्क साधताच, त्यांनी तक्रारदार यांना त्यांच्याविरुद्ध तक्रार प्रप्त झाली असून गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे सांगितले. गुन्हा दाखल न करण्यासाठी दहा लाखांची मागणी केली. तडजोडी अंती पाच लाख रुपयाची मागणी करताच तक्रारदार यांनी १८ एप्रिल रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यालयात धाव घेतली.

तक्रारीनुसार, केलेल्या पडताळणीत गुहाडे यांनी तडजोडी अंती ३ लाखाची मागणी करून खासगी व्यक्ती गौरव गम शिरोमणी मिश्रा याच्यामार्फत लाच स्वीकारण्याचे मान्य केल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार करण्यात आलेल्या सापळा कारवाईत मिश्रा हा  मागणी केलेल्या रक्कमेपैकी १ लाख रुपये स्वीकारताना रंगेहाथ मिळून आला. त्यानुसार, दोघांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Right Menu Icon