पुण्यात स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थींनीची आत्महत्या, नातेवाईकांसह मैत्रिणींची पाेलिस चाैकशी सुरु
योगेश पांडे / वार्ताहर
पुणे – पुण्यात स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थींनीने आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. अभिलाषा मित्तल (वय २७), मूळ राहणार वाशिम असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यींनी युवतीचे नाव आहे. अधिक तपास खडक पाेलिस करीत आहेत.
प्राथमिक माहितीनुसार वाशिम येथील अभिलाषा मित्तल ही गेल्या काही महिन्यांपासून पुण्यात स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी वास्तव्यास होती. पुण्यातील गुरुवार पेठेत एका हॉस्टेलमध्ये काही मैत्रिणींसोबत ती राहत होती. अभिलाषाने तिच्या खोलीचा दरवाजा बंद करून आत्महत्या केली. मैत्रिणींनी दरवाजा उघडण्यासाठी प्रयत्न केला असता आत मधून कुठलाच आवाज येत नसल्याने मैत्रिणींनी रूमची खिडकी उघडली. त्यांना अभिलाषाने आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले.
दरम्यान पाेलिसांनी दिलेल्या माहितीनूसार अभिलाषा हिच्या अंगावर मारहाणीच्या खुणा असल्याचं प्राथमिक तपासात समोर आले आहे. त्यामुळे ही हत्या की आत्महत्या यादृष्टीने तपास सुरु असून तिच्या नातेवाईकांची आणि इतर मैत्रिणींची चौकशी सुरू आहे.