मुंबई कस्टम विभागाकडून तब्बल १२ तस्करी गुन्ह्याचा छडा; ८ कारवाईतून ८.१० किलो सोने जप्त
योगेश पांडे – वार्ताहर
मुंबई – मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर मुंबई सीमा शुल्क विभागाने एकूण ८ कारवाईतून तब्बल ८.१० किलो सोनं जप्त केलं आहे. गुदद्वार तसेच परिधान केलेल्या कपड्यातून सोन्याची तस्करी केली जात असल्याची माहिती मुंबई कस्टम विभागाने दिलीय. या वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये एकूण ४.८१ कोटी रुपयांचं सोनं जप्त करण्यात आलं आहे. मुंबई कस्टम विभागाने ६-७ एप्रिल या २ दिवसात ही कारवाई केलीय. या दोन दिवसात मुंबई कस्टम विभागाने तब्बल १२ तस्करी गुन्ह्याचा छडा लावलाय.