मनाई आदेशाचा भंग करणारा तडीपार गुंडाला अटक; शीळ डायघर पोलिसांची कारवाई
पोलीस महानगर नेटवर्क
ठाणे – तडीपारीची कारवाई केल्यानंतरही शहरात वास्तव्य करणाऱ्या गुंडाला शीळ डायघर पोलिसांनी जेरबंद केलं आहे. गुलजार पीर मोहम्मद खान उर्फ राहुल काल्या (वय २२, रा. दहिसर मोरी, ठाणे ) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
गुलजार पीर मोहम्मद खान उर्फ राहुल काल्या याच्या विरोधात गंभीर गु्न्हे दाखल आहेत. त्याला ठाणे जिल्हा हद्दीतून पोलीस उपआयुक्त, परिमंडळ-१, ठाणे यांनी तडीपार करण्याचे आदेश दिले होते. तडीपार केल्यानंतर पोलीस उपायुक्त,परिमंडळ -१ यांच्या परवानगीशिवाय प्रवेश करण्यास मनाई असताना मनाई आदेशाचा भंग करून गुलजार पीर मोहम्मद खान उर्फ राहुल काल्या हा दि. ८ एप्रिल,२०२४ रोजी पूजा पंजाब हॉटेलजवळ, शीळ-महापे रोड, ठाणे येथे एक पिस्तुल व ५ जिवंत काडतुस बेकायदेशीररित्या जवळ बाळगले असताना, शीळ डायघर पोलीस ठाण्याच्या पथकास मिळून आला.
सदर प्रकाराबाबत सरकारतर्फे दिलेल्या फिर्यादीवरून आरोपीविरुद्ध गुन्हा रजि.नं. || ७७३/२०२४, भारतीय हत्यार कायदा कलम ३, २५ सह महाराष्ट्र पोलीस कायदा कलम १४२, ३७ (१), १३५ प्रमाणे गुन्हा करण्यात आला असून आरोपी गुलजार पीर मोहम्मद खान उर्फ राहुल काल्या यास अटक करण्यात आली आहे. सदर गुन्ह्याचा तपास शीळ डायघर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक शिंदे हे करीत आहेत.