धक्कादायक! शिंदे गटाच्या उपजिल्हाप्रमुखावर शिंदे गटाच्या जिल्हाप्रमुखा प्राणघातक हल्ला
पोलीस महानगर नेटवर्क
बीड – शिवसेना शिंदे गटाच्या उपजिल्हाप्रमुखावर जीवघेणा हल्ला झाला होता. या घटनेत गंभीर जखमी झालेल्या उपजिल्हाप्रमुखावर उपचार सुरू आहेत. त्यांच्या पायावर आणि डोक्यात वार करण्यात आले होते. या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल केला आहे. आरोपींमध्ये शिंदे गटाच्याच जिल्हा प्रमुखांचे नाव आहे. गावात ग्रामपंचायत निवडणुकीत लावलेल्या बॅनवरून दोघांमध्ये वाद झाला होता. याच वादातून हा हल्ला झाल्याचं समोर आलंय. आता पोलिसांनी या प्रकरणी शिंदे गटाच्या जिल्हाप्रमुखासह १२ जणांवर गुन्हा दाखल केलाय.
काय घडले नेमके?
बीड जिल्ह्यातील शिंदे गटाच्या शिवसेनेमधील वाद चव्हाट्यावर आला आहे. ३ एप्रिल रोजी ज्ञानेश्वर खांडे हे गावी जात असतांना त्यांची गाडी अडवून लोखंडी रॉड व लाकडी दांड्याने मारहाण झाली होती. त्यांच्यावर सध्या पुणे येथे उपचार करण्यात येत आहेत. दरम्यान आता ज्ञानेश्वर खांडे यांच्या तक्रारीवरुन शिवसेनेचे बीड जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांच्यासह गणेश खांडे, नामदेव खांडे, गोरख शिंदे अशा बाराजणांवर बीड ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिवसेना शिंदे गटाचे उपजिल्हाप्रमुख ज्ञानेश्वर खांडे यांच्यावर धारधार शस्त्राने आणि रॉडने हल्ला झाला होता. दहा ते बारा जणांनी हा हल्ला केला होता. यानंतर ज्ञानेश्वर खांडे यांनी पोलिसात तक्रार दाखल केली होती. या तक्रारीनुसार शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे आणि इतर १२ जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. ग्रामपंचायत निवडणुकीच्या बॅनरवरून माळस जवळा गावात दोन गटात वाद झाला होता. त्यातूनच कुंडलिक खांडे यांनी आपल्याला मारहाण केल्याचा आरोप उपजिल्हाप्रमुख ज्ञानेश्वर खांडे यांनी केला.