डोंबिवलीत धाडसी घरफोडी, ३ लाख २ हजारांचा मुद्देमाल लांबविला

Spread the love

डोंबिवलीत धाडसी घरफोडी, ३ लाख २ हजारांचा मुद्देमाल लांबविला

पोलीस महानगर नेटवर्क

डोंबिवली – डोंबिवली पूर्व येथील महिलेच्या राहत्या घरातील लाकडी कपाटातील ड्रावरमध्ये ठेवलेले सोन्याचे दागिने अज्ञात चोरट्याने घरात प्रवेश करून एकूण ३ लाख २ हजार रूपयांचा मुद्देमाल चोरून चोरट्यांनी पोबारा केला आहे.ही घटना सोमवार दि. १८, फेब्रुवारी ते १५,मार्च २०२४ रोजी दुपारी घडली आहे.

याबाबत मानपाडा पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, डोंबिवली पूर्व येथे फिर्यादी महिला (३२) राहात असून लॅब टेक्निशियन म्हणून काम करतात. १८ फेब्रुवारी ते १५ मार्च दरम्यान दुपारीच्या वेळेस अज्ञात चोरट्याने महिलेच्या घरात प्रवेश करून सोन्याचे मौल्यवान दागिने चोरी करून चोरट्याने पोबारा केला आहे.

याप्रकरणी महिलेने दिलेल्या फिर्यादीवरुन मानपाडा पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा रजिस्टर नंबर | ४१३/ २०२४ भादवी कलम ३८० प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास मानपाडा पोलीस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक मुसळे हे करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Right Menu Icon