महायुतीमध्ये मुंबईच्या चार जागांवर उमेदवारांची गाडी अडली

Spread the love

महायुतीमध्ये मुंबईच्या चार जागांवर उमेदवारांची गाडी अडली

भाजप मनसेला आघाडीत सहभागी करून शिर्डी किंवा रत्नागिरीतून बाळा नांदगावकर यांना उमेदवारी देण्याची शक्यता

योगेश पांडे / वार्ताहर 

मुंबई – भाजप-शिवसेनेतील बेबनाव आणि नंतरची शिवसेनेतील फाटाफूट यामुळे राज्याचे शक्तिस्थान असलेल्या मुंबईबाबत सावधानतेने पावले उचलत भाजपने दोन मतदार संघांमध्ये उमेदवार घोषित केले असले तरी दक्षिण मुंबई, उत्तर-पश्चिम मुंबई आणि उत्तर-मध्य मुंबईतील उमेदवारांची गाडी पुढे सरकलेली नाही. भाजपने मनसेला आघाडीत सहभागी करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आशीष शेलार यांनी यासंदर्भात विधाने केली आहेत. दरम्यान, महायुतीने दक्षिण मुंबईत धनुष्यबाण किंवा कमळावर मतदान करण्याचा सल्ला दिला होता. मनसेच्या एका सूत्राने यावर कसे प्रतिसाद द्यावे याचा विचार केला जात आहे असे सांगितले.

शिर्डी किंवा रत्नागिरीतून बाळा नांदगावकर यांना उमेदवारीतून लढवण्याचा प्रस्ताव दिला जात आहे. उत्तर पश्चिम मतदारसंघात गजानन कीर्तिकर शिवसेना शिंदे गटात असले तरी, त्यांचे पुत्र अमोल कीर्तिकर शिवसेना ठाकरे गटाकडून निवडणूक लढविण्याचे ठरविले आहे. येथे विजयी उमेदवार निवडणे ही आघाडीची मोठी जबाबदारी आहे. उत्तर-मध्य मतदारसंघातून पूनम महाजन यांच्या जागी आशीष शेलार यांना उमेदवारीत उतरविण्याचा विचार सुरू आहे. पीयूष गोयल सारख्या ज्येष्ठ मंत्र्यांना निवडून देण्याची काळजी घेताना, मिहीर कोटेचा यांचा नवीन चेहरा समोर आणण्यात आला आहे. राहुल शेवाळे यांच्या शिंदे गटाकडील उमेदवारी वगळता, इतर काही अद्याप निश्चित नसल्याचे समजते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Right Menu Icon