४० हजारांची लाच घेताना महसूल कर्मचारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात

Spread the love

४० हजारांची लाच घेताना महसूल कर्मचारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात

पनवेल – भोगवटादार वर्ग-२ ची जमीन भोगवटादार वर्ग-१ मध्ये करण्यासाठी लाच मागणार्‍या पनवेल तहसील कार्यालयातील महसूल सहाय्यकला ४० हजाराची लाच घेताना नवी मुबई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ अटक केली आहे. तक्रारदार जयदास गायकर यांची गिरवले येथे स्वतःच्या मालकीची शेतजमीन आहे. जयदास यांनी त्यांच्या वडिलांच्या नावाने शेतजमिनी भोगवटादार वर्ग- २ मधील जमीन भोगवटादार वर्ग-१ मध्ये वर्ग करण्यात यावा असा अर्ज केला होता, मात्र तक्रारी अर्ज करून देखील तीन महिने कारवाई झाली नाही. जयदास गायकर यांनी तहसील कार्यालयातील महसूल सहाय्यक किरण गोरे यांच्याशी या संदर्भात तब्बल सहा वेळा भेट घेतली. त्या वेळी हे काम करण्यासाठी काही तरी द्यावे लागेल असे सांगत १ लाख २० हजाराची मागणी केली होती.

पैशाची ही मागणी झाल्यानंतर याबाबतची तक्रार नवी मुबई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला केली असता लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पहाणी केल्यानंतर, गोरे यांनी मला फक्त ४० हजार द्या अशी मागणी केली. त्यानुसार पैसे देताना महसूल सहाय्यक किरण गोरे याला नवी मुंबई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लाच स्वीकारताना रंगेहाथ अटक केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Right Menu Icon