कल्याणमध्ये घरफोडी करणाऱ्या दोन अट्टल चोरट्याना जेरबंद ; २२ लाखाचे दागिने हस्तगत

Spread the love

कल्याणमध्ये घरफोडी करणाऱ्या दोन अट्टल चोरट्याना जेरबंद ; २२ लाखाचे दागिने हस्तगत

पोलीस महानगर नेटवर्क

कल्याण – कल्याण डोंबिवली परिसरात मोठया प्रमाणात चेन स्नाचिंग,घरफोडी, चोरी,मारामारी दिवसेंदिवस होत आहे.अशीच एक घरफोडीची घटना कल्याण पूर्व परिसरात घडली आहे. कोळशेवाडी पोलिसांना घरफोडी करणाऱ्या दोन अट्टल चोरट्यांना जेरबंद करण्यात यश आले आहे. त्यांच्याकडून पोलिसांनी १२ लाखाचे दागिने जप्त केले आहेत. अटक करण्यात आलेल्या राजेश राजभर व राहुल घाडगे अशी दोन चोरट्यांची नावे आहेत.

राजेश राजभर विरोधात बदलापूर, अंबरनाथ, कल्याण, डोंबिवली, टिटवाळा, वसई, विरार, मुंबई, पुणे येथील पोलिस ठाण्यात ३० घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक गणेश नायदे, सहाय्यक पोलिस निरीक्षक दिनकर पगारे, पोलीस अधिकारी मदने, सुशील हांडे, सुरेश जाधव, सचिन कदम यांच्या पथकाने तपास सुरू केला असता गुप्त माहिती व सीसीटीव्हीच्या आधारे आरोपींची ओळख पटवून या चोरट्यांना पकडण्यासाठी पोलिसांनी वेगवेगळ्या ठिकाणी सापळा रचला होता. विठ्ठलवाडी बस डेपोजवळ रचलेल्या सापळ्यात सराईत चोरटा राहुल घाडगे याला पकडण्यात पोलिसांना यश आले. राहुल घाडगे विरोधात कोळशेवाडी पोलीस ठाण्यातच तब्बल पाच घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत. त्याच्याकडून पोलिसांनी दोन लाख दहा हजारांचे सोन्याचे दागिने जप्त केले तसेच कोळशेवाडी पोलिसांना घरफोडी करणारा अट्टल गुन्हेगार राजेश राजभर हा उत्तर प्रदेश येथे आपल्या गावी लपून बसल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी उत्तर प्रदेश आजमगड येथील लालगंज परिसरात वेशांतर करून सापळा रचला व त्या ठिकाणाहून राजेश राजभर याला जेरबंद करण्यात यश आले. कोळशेवाडी पोलिसांनी आतापर्यंत त्याच्याकडून चार गुन्ह्यांची उकल करत दहा लाखांचे दागिने हस्तगत केले.दोन्ही आरोपींकडून जवळपास २२ लाख रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. याप्रकरणी कोळसेवाडी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon