बुलढण्यात महाराष्ट्र बँकेचे एटीएम फोडले ; चोरटे रोकड घेऊन पसार
पोलीस महानगर नेटवर्क
बुलढाणा – राज्यात अनेक ठिकाणी रात्रीच्या सुमारास एटीएम फोडण्याच्या घटना मोठया प्रमाणावर घडताना दिसत आहेत. असाच प्रकार बुलढाणा जिल्ह्यातील मोताळा तालुक्यातील शेंबा या गावाच्या मुख्य महामार्गावर घडला आहे. येथील एटीएम मशीन गॅस कटरच्या साहाय्याने कापून यातील लाखो रुपयांची रोकड लंपास केली.
सुरक्षा यंत्रणेमुळे (अलर्ट अलार्म) बोराखेडी पोलीस अवघ्या पंधरा मिनिटात घटनास्थळी दाखल झाले. चोरांच्या टोळीने वापरलेल्या कार चा पोलिसांनी पाठलाग केला. मात्र कार चा वेग जास्त असल्याने चोरटे पळून जाण्यास यशस्वी झाले. याप्रकरणी पोलीस सीसीटीव्हीच्या आधारे तपास करीत आहेत.