ठाण्यात धाडसी घरफोडी, ६ लाख ९३ हजारांचा मुद्देमाल लांबविला
पोलीस महानगर नेटवर्क
ठाणे – पोखरण रोड येथील महिलेच्या राहत्या घराच्या उघड्या दरवाजावाटे अज्ञात चोरट्याने आत प्रवेश करून घरातील सोन्याचे दागिने असलेली बॅग त्याची किंमत एकूण ६ लाख ९३ हजार रूपयांचा मुद्देमाल चोरून चोरट्यांनी पोबारा केला आहे.ही घटना सोमवार दि. ५ मार्च ते ६ मार्च रोजी दुपारी घडली आहे.
याबाबत वर्तकनगर पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, पोखरण रोड नं.२, ठाणे येथे फिर्यादी महिला राहात आहे. मंगळवार ते बुधवार दरम्यान दुपारीच्या वेळेस अज्ञात चोरट्याने महिलेच्या घरात प्रवेश करून तिने बागेत ठेवलेल्या दागिन्यांची चोरी करून चोरट्याने पोबारा केला आहे.
याप्रकरणी महिलेने दिलेल्या फिर्यादीवरुन वर्तकनगर पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा रजिस्टर नंबर २२८/ २०२४ भादवी कलम ३८० प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे पुढील तपास वर्तकनगर पोलीस ठाण्याच्या महिला पोलिस उपनिरीक्षक शेट्टी या करीत आहेत.