पिंपरीत बनावट नोटांची छपाई करणारी टोळी अटकेत; चीनमधील कागदाचा वापर,उडता पुणे !

Spread the love

पिंपरीत बनावट नोटांची छपाई करणारी टोळी अटकेत; चीनमधील कागदाचा वापर,उडता पुणे !

पिंपरी – पुण्यात हिंजेवाडी येथे बनावट नोटा तयार करणाऱ्यांना अटक करण्यात आल्याची घटना ताजी असतांना आणखी एक धक्कादायक प्रकार उघडकीस आली आहे. चीन मधून ऑनलाइन कागद मागवून तर पुण्यातील अप्पा बळवंत चौकातून ऑफसेट मशीन खरेदी करत दिघीत बनावट नोटा छापण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. दिघीतिल मॅगझिन चौकात सुरू असलेला या उद्योगाचा पर्दाफाश देहूरोड पोलिसांनी केला. या प्रकरणी म्होरक्यासह सहा जणांना बेड्या थोकण्यात आल्या असून ७० हजार रुपये किंमतीच्या बनावट नोटा व साहित्य जप्त करण्यात आले आहे. ही कारवाई किवळे येथील मुकाई चौकात करण्यात आली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी खडसे हा ७० हजार रुपये किंमतीच्या बनावट प्रिंटींग असलेल्या १४० नोटा चलनात आणण्याचा प्रयत्न करत होता. आरोपीने या नोटा कोठून व कोणाकडून आणल्या याचा तपास पोलीस करीत आहेत. ऋतिक चंद्रमणी खडसे (२३) रा. कंद पाटील नगर, विठ्ठलवाडी देहुगाव मुळ रा. मु.पो. मेंढा ता. मंगळुरपीर जि. वाशिम असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्यावर आयपीसी ४८९(क) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलीस अंमलदार किशोर विठ्ठल परदेशी यांनी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक जाधव करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon