डोंबिवली परिसरात चोरट्याचा सुळसुळाट ; पोलीसांची कारवाई पण गुन्हेगारांना धाक नाही
प्रकाश संकपाळ
डोंबिवली – डोंबिवली परिसरात विविध ठिकाणी गेल्या अनेक महिन्यांपासून घरफोडी करणारी टोळी सक्रिय झाली असून गेल्या अनेक घरांना त्यांनी लक्ष केले आहे.पोलिसांनी अनेकवेळा कारवाई करून देखील चोरट्याना कोणतीच भीती वाटत नसल्याने दिसून येत आहे.मानपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत नुकत्याच दोन घरफोडीच्या घटना घडल्या आहेत. राम सतय्या रापोलू, (४०),हे निळजे डोंबिवली पूर्व परिसरातील राहत्या घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून चोरट्याने त्यावाटे आत प्रवेश करून घरातील सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा एकूण ४,०९,५००/- रु.किंमतीचा ऐवज घरफोडी करून चोरून नेला आहे.
याबाबत राम रापोलू यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात आरोपीविरूध्द गुन्हा रजि. नं. २१४/२०२४ भा.द.वि. कलम ४५४,४५७,३८० प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन गुन्हयाचा पुढील तपास मानपाडा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पाटील हे़ करीत आहेत.
तर दुसऱ्या एक घरफोडी प्रकरणात संदीप देवानंद मांगरुळकर (३६),निळजेपाडा डोंबिवली पूर्व परिसरातील राहत्या घरातून बेडरूमची स्लाईड खिडकी कोणीतरी अज्ञात चोरट्याने उघडून त्यावाटे आत प्रवेश करून कपाटातील एकूण ७,८०,०००/- रु.किंमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेले.सदर प्रकाराबाबत फिर्यादी संदीप मांगरूळकर यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा रजि.नं.२१५/२०२४ भा.द. वि. कलम ४५७,३८० प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सहारे करीत आहेत