भिवंडी येथील गोदामातून चोरी करणाऱ्या इसमास अटक ; नारपोली पोलिसांनी ठोकल्या बेड्या

Spread the love

भिवंडी येथील गोदामातून चोरी करणाऱ्या इसमास अटक ; नारपोली पोलिसांनी ठोकल्या बेड्या

प्रकाश संकपाळ

भिवंडी – भिवंडी परिसरात मोठया प्रमाणावर चोरयांचे प्रमाण वाढले आहे.पोलीस कारवाई करून देखील गुन्हे घडत आहेत.अशीच एक घटनास भिवंडी येथील ग्लु टेप इंडिया लिमिटेड, दापोडे येथील गोदामातून पीव्हीसी इलेक्ट्रॉकल इन्सुलेशन तेपचे २४० बॉक्स चोराने लंपास केले.

भिवंडी गुन्हे शाखा युनिट -२ च्या सहाय्यक पोलीस निरीक्षक माळी यांनी तांत्रिक विश्लेषण च्या आधारे गिरीश सुनील तपासे (३५) रा. नांदीवली, कल्याण येथून ताब्यात घेऊन चौकशी केली असता आरोपी गिरीश तपासे याने गुन्ह्याची कबुली दिली. सदर आरोपीकडून चोरीस गेलेले २४० बॉक्स त्यांची अंदाजे किंमत १०,८०,०००/- रु.असून सर्व मुद्देमाल जप्त करण्यात आला. नारपोली पोलीस ठाण्यात सदर आरोपीविरूध्द गुन्हा रजि. नं. ३६५/२०२४ भा.द.वि. कलम ४५४,४५७, ३८० प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन गुन्हयाचा पुढील तपास नारपोली पोलीस करीत आहेत अशी माहिती पोलीस निरीक्षक सचिन गायकवाड यांनी दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Right Menu Icon