डोंबिवली पूर्वमध्ये आंतरशालेय विज्ञान प्रदर्शन व पोस्टर् स्पर्धा २०२४ चे आयोजन
दीड लाखांहून अधिक बक्षीसांची खैरात
डोंबिवली – कल्याण शिळफाटा रोडवरील विको नाका येथील अनंतम रिजेन्सी परिसरात विद्यार्थ्यांच्या कला गुणांना वाव देण्यासाठी २०१४ पासून विविध विषयांवर आधारित प्रदर्शनाचे आयोजन केले जाते. दर वर्षी अंदाजे २५ हजारांहून अधिक विद्यार्थी या प्रदर्शनास भेट देतात. विद्यार्थ्यांचा उत्साह वाढविण्यासाठी पुन्हा एकदा विद्यार्थ्यांमधील सुप्त कला गुणांना संधी देण्यासाठी त्यांच्यातल्या शास्त्रज्ञांना वाव देण्यासाठी कल्याण डोंबिवली परिसरातील विद्यार्थ्यांसाठी आंतर शालेय विज्ञान प्रदर्शन आणि पोस्टर् स्पर्धा येत्या २९ व ३० जानेवारी २०२४ रोजी रीजन्सी अनंतम, डोंबिवली (पूर्व) येथे सकाळी १० ते रात्री ८ या वेळेत आयोजित करण्यात आले आहे.. सदरचे प्रदर्शन हे सर्वांसाठी विनामूल्य असून शाळांसाठी बसची सेवा देखील उपलब्ध करून दिलेली आहे. या कार्यक्रमातून विद्यार्थ्यांना विज्ञाना बद्दल संपूर्ण माहिती घेण्याची संधी उपलब्ध होणार आहे. विद्यार्थ्यांना विज्ञान विषयामध्ये स्वारस्य घेण्यास प्रवृत्त करण्यासाठी विशेष आंतरशालेय विज्ञान प्रदर्शन आयोजित केले आहे तसेच पोस्टर स्पर्धेचे देखील आयोजन करण्यात आले आहे. जिंकणाऱ्या शिक्षकांना व विद्यार्थ्यांना रोख रक्कम, पारितोषिक, विशेष प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. या वर्षी ५० हुन जास्त शाळा सहभागी झाल्या असल्याचे प्रमुख आयोजक संतोष डावखर यांनी दैनिक ‘पोलीस महानगर’ शी बोलताना सांगितले.