तरुणीची हत्या करून तरुणाने केली आत्महत्या?
ओमकार नागावकर / अलिबाग
पनवेल – प्रयसीची हत्या करुन तरुणाने आत्महत्या केल्याची घटना कळबोली वसाहतीमध्ये समोर आली आहे. तरुणीचा मृतदेह खारघर येथील ओवेकॅम्प गावाजवळील निर्जनस्थळी सापडला. तर प्रयकराचा मृतदेह नेरुळ जुईनगर रेल्वेरुळावर सापडला होता. कळंबोली वसाहतीमध्ये राहणार्या १९ वर्षीय वैष्णवी बाबर आणि २६ वर्षीय वैभव गंगाधर बुरुंगले यांचे प्रेमसंबंध असल्याचे समजते.
१२ तारखेपासून हे दोघेही बेपत्ता झाल्याचे समजल्यावर या दोघांच्या नातेवाईकांनी त्यांची शोधाशोध सुरू केली. नवी मुंबई पोलीसांचे विशेष पथकाला वैभवचा मृतदेह नेरुळ जुईनगर रेल्वेरुळावर सापडला होता. मात्र, वैष्णवीचा शोध लागू शकला नव्हता. अखेर या तरुणीचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत खारघर येथील ओवेकॅम्प गावाजवळ सापडला. वैष्णवीला मारल्यानंतर वैभव रेल्वेरुळापर्यंत गेला का? असा प्रश्न तपास करणार्या पोलीसांना पडला आहे. सदर गंभीर स्वरूपाच्या मिसींगमधिल खुनाच्या प्रकरणाचा उलगडा नवी मुंबई पोलीस तसेच शिवदुर्ग रेस्क्युटीम, लोणावळा, फायर ब्रिगेड, सिडको, वन विभाग व पोलीस मित्रांच्या मदतीने करण्यात आला.